घरमुंबईBharat Ratna : मोदींना पुन्हा एकदा बाळासाहेबांचा विसर पडला; ठाकरे गटाचा टोला

Bharat Ratna : मोदींना पुन्हा एकदा बाळासाहेबांचा विसर पडला; ठाकरे गटाचा टोला

Subscribe

मुंबई : केंद्र सरकारने माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासह हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. स्वामीनाथ यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी हा सन्मान बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र प्रकरणी आता विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करताना पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे, असे म्हटले आहे. (Bharat Ratna Modi once again forgot Balasaheb Thackeray group)

हेही वाचा – Nikhil Wagle : मरण डोळ्यासमोर होतं, मात्र…; हल्ल्यानंतर निखिल वागळे यांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की, स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडला आहे. पहिल्या वेळेला दोन आणि आता तीन नेत्यांना अवघ्या एका महिन्यात भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र, वीर सावरकर किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, जे भारतरत्नासाठी अधिक पात्र आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : निखिल वागळे कितीही चुकीचे बोलले तरी…; पुणे हल्लाप्रकरणी फडणवीसांचे भाष्य

वास्तविक, एका वर्षात तीन व्यक्तींना भारतरत्न देऊन सन्मानित केले जाऊ शकते. मात्र पंतप्रधान मोदींनी पाच भारतरत्नांची घोषणा केली आहे. निवडणूक तोंडावर आली आहे हे स्पष्ट आहे. कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर आज चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. इतर नेतेही वाट पाहत आहेत. पण देशावर पसरलेल्या हिंदू लाटेचे खरे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान का विसरले? असा प्रश्न उपस्थित करत लक्षात ठेवा बाळासाहेबांमुळेच पंतप्रधान मोदींना अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पार पडला, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -