घरमुंबईबिग बी पाठोपाठ अदनान सामीचे ट्विटर खाते हॅक

बिग बी पाठोपाठ अदनान सामीचे ट्विटर खाते हॅक

Subscribe

हॅकर्सच्या लक्ष्यावर बॉलिवूडचे दिग्गज ! ,मुंबई पोलिसांनी घेतली दखल

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या पाठोपाठ सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांचे देखील ‘ट्विटर’ खाते हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलचा प्रोफाईल फोटो बदलून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता, तसेच ‘लव्ह पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात एकच हॅकर्स असून त्याच्या लक्ष्यावर बॉलीवुडचे आणखी काही अभिनेते-अभिनेत्री असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून राज्य सायबर पथक आणि मुंबई सायबर सेलला याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते पोलीस उपआयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटले आहे.

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन (बिगबी) यांचे सोमवारी रात्री ’ट्विटर’ खाते हॅक करण्यात आले होते, त्यांच्या ट्विटर’ हॅण्डलचा प्रोफाइलवरील फोटो बदलण्यात आला होता, त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यांच्या ‘ट्विटर’ हॅण्डलच्या बायोमध्ये ’लव्ह पाकिस्तान’ असे लिहिण्यात आले होते. अमिताभ यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तुर्की आणि पाकिस्तानशी संबंधित पोस्टे शेअर करण्यात आलेल्या आहेत. बिगबी यांचे ट्विटर खाते हॅक कऱण्यात आल्याचे माहिती सोमवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आणखी बॉलिवूड तसेच बिगबी यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती.

- Advertisement -

तुर्कीस्तान मधील ’टर्किश साइबर आर्मी ’अयिल्दिज टीम’ने बिग बी यांचे ट्विटर हॅण्डल हॅक केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अमिताभ यांचे ट्विटर हॅण्डल रिकव्हरही करण्यात आले. तसेच हॅकर्सनी केलेले सर्व ट्वीट डिलीट केले आहेत. मात्र या पाठोपाठ सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याचे देखील ट्विटर हॅण्डल खाते हॅक कऱण्यात आले त्याचा प्रोफाइलवरील फोटो बदलून त्याजागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांतील हॅकर्स एकच असून त्याच्या लक्ष्यावर बॉलिवूडचे आणखी काही सिनेतारका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून गंभीरतेने दखल घेण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून ’राज्य सायबर सेल’ आणि मुंबईतील सायबर सेलला याची माहिती देण्यात आली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते, उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -