घरमुंबई20 लाखांच्या बाईकने घेतला तरुणाचा बळी

20 लाखांच्या बाईकने घेतला तरुणाचा बळी

Subscribe

मित्रांसोबत लाँग ड्राईव्हवर गेलेल्या वसईतील एका तरुणाचा 20 लाखांच्या बाईकने बळी घेतल्याचे उघड झाले आहे.
झोएब मर्चंट असे या तरुणाचे नाव असून दर रविवारी मित्रांसोबत वसई ते डहाणूपर्यंत बाईकने लाँग ड्राईव्हला जाण्याचा त्यांना छंद होता. त्यासाठी झोएबने 20 लाखांची अगुस्ता एमव्ही ही इटालियन बाईक घेतली होती.

रविवारी सकाळी या बाईकवरून तो डहाणूला गेला होता. त्याच्यासोबत 18 मित्रही आपापल्या बाईकने गेले होते. तिथून परतत असताना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरजवळ झोएबच्या बाईकचा पुढच्या टायरचा ब्रेक अचानक जाम झाला. त्यामुळे झोएब बाईकवरून चेंडूसारखा उडाला. तो दुभाजकावर जावून आपटला.

- Advertisement -

मित्रांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. झोएबच्या गाडीच्या पुढच्या चाकाचा ब्रेक अचानक जाम होण्याची ही तिसरी घटना होती. यापूर्वी दोनदा अचानक ब्रेक लागला होता. तसेच पुढच्या ब्रेकची मार्च 2019 पर्यंत वॉरंटीही होती. त्यामुळे झोएबने कंपनीकडे तक्रारही केली होती.या तक्रारीकडे कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. या दुर्दैवी अपघातामुळे झोएबच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. झोएबला आई-वडील,तीन भावंडे,पत्नी आणि 6 वर्षांचा मुलगा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -