घरमुंबईभाजपच्या कुरघोडीमुळे दुष्काळाचा सेनेकडून स्वतंत्र आढावा

भाजपच्या कुरघोडीमुळे दुष्काळाचा सेनेकडून स्वतंत्र आढावा

Subscribe

मराठवाड्यातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दुष्काळाचे निमित्त करत भाजपने सुरू केलेल्या घुसखोरीची दखल घेत सेनेच्या मंत्र्यांना तातडीने तिथे जाऊन दुष्काळाचा आढावा घेण्याच्या सूचना सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. भाजपच्या कृतीची दखल घेत मंत्र्यांचा आढावा येताच स्वत: उध्दव ठाकरे मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळी स्थिती आहे. या दोन विभागातील सुमारे १५० दुष्काळी तालुक्यांच्या नावांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याआधी केली होती. मराठवाड्यातील बहुतांश तालुके हे शिवसेनेच्या मतदारसंघाशी संबंधित असल्याने मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या तिथल्या आमदारांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता भाजपने या तालुक्यांमध्ये जाऊन तिथे मदतीच्या सूचना आपल्या मंत्र्यांना दिल्या. यामागे पक्षाचा प्रसार त्या तालुक्यांमध्ये करण्याचा भाजपचा कुटिल डाव स्पष्ट दिसत होता. ही बाब सेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कानी येताच त्यांनी तात्काळ आपल्या मंत्र्यांना ‘मातोश्री’ बंगल्यावर पाचारण होण्याचे आदेश दिले. भाजपचे मंत्री तिथे पोहोचत असतील तर तुम्ही काय करता, अशी विचारणा करत उध्दव यांना आपल्या मंत्र्यांना तात्काळ मराठवाड्यात जाऊन दुष्काळ स्थितीचा आढावा घ्या, अशा सूचना दिल्या. पुढील आठवड्यात मी स्वत: तिथे येईन, असे उध्दव यांनी आपल्या मंत्र्यांना बजावल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -
आज सेना पदाधिकार्‍यांची बैठक

मराठवाड्याती भीषण दुष्काळाचा आढावा घेण्याच्या शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेल्या आदेशानंतर आज सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आणि पदाधिकार्‍यांची विशेष बैठक सेनाभवनात बोलवण्यात आली आहे. मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळाचा आढावा घेण्यात शिवसेना मागे पडल्याची गंभीर दखल उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. भाजपच्या मंत्र्यांना पक्षाने तिथे रवाना करण्याच्या केलेल्या सूचनांमागे कुटील डाव असल्याचे लक्षात आल्यावर उध्दव यांनी आपल्या मंत्र्यांना तिथे जाण्यास सांगितले. पुढील आठवड्यात उध्दव स्वत: मराठवाड्यात जाण्याचे योजत आहेत. या दौर्‍याआधी पदाधिकार्‍यांनाही मराठवाड्याच्या स्थितीची माहिती घेण्यास सांगितले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -