घरमुंबई'काय होतास तू, काय झालास तू' - भाजपाची 'राज ठाकरे' यांच्यावर टीका

‘काय होतास तू, काय झालास तू’ – भाजपाची ‘राज ठाकरे’ यांच्यावर टीका

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सडकून टीका करत असताना भाजपाने पुन्हा एकदा 'राज ठाकरे' यांच्यावर 'काय होतास तू, काय झालास तू', अशी टीका केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सडकून टीका करत आहेत. आता तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी सात ते आठ जाहीर सभा घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळेच आता या मुद्द्यावरून भाजपाने राज ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. एवढच नाही तर ‘काय होतास तू? काय झालास तू?, असे लिहून राज ठाकरे यांची व्यंगचित्र देखील टाकण्यात आली आहेत.

काय केलीय नेमकी टीका

भाजपाने राज ठाकरेंवर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून टिका करत, ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये!’, असे सांगत भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटरवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये राज यांची २०१४ मधील आणि आताची भूमिका असणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. तसेच या व्यंगचित्रामध्ये रेल्वे इंजिनवर बसून ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या’, असे म्हणत कार्यकर्त्यांनी भरलेला रेल्वेचा डबा घेऊन जाताना दिसत आहेत. तर याच इंजिनावर बसलेले राज ठाकरे ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या’ म्हणत २०१९ च्या निवडणुकांकडे जाताना दाखवण्यात आले आहेत. एवढंच नाही तर इंजिनाच्या मागच्या डब्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या तोंडी, ‘आपल्याला हे काय मुर्ख समजतात का?’, ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे’, असे देखील लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारी राज ठाकरेंच्या प्रचारसभांसाठी आग्रही!

वाचा – ‘शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’; आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -