घरमहाराष्ट्रकाँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारी राज ठाकरेंच्या प्रचारसभांसाठी आग्रही!

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारी राज ठाकरेंच्या प्रचारसभांसाठी आग्रही!

Subscribe

काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आग्रही

श्वास रोखून ठेवा, धुरळा उडणार आहे… ईलाका तेरा धमाका मेरा… ’गर्दीमुळे नाव होत नाही, नावामुळे गर्दी होते’…. अशा फेसबुक पोस्ट सध्या राज ठाकरे यांच्या आगामी सभांच्या निमित्ताने मनसैनिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या आहेत. पाडवा मेळावा येत्या शनिवारी ६ एप्रिलला असला तरीही, सध्या चर्चा आहे ती राज ठाकरे कोणत्या उमेदवारासाठी राज्यात कुठे सभा घेणार याचीच. येत्या पाडवा मेळाव्यालाच मनसेप्रमुख राज ठाकरे कुठे आणि किती सभा घेणार याबाबतची घोषणा होईल असे कळते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात राज ठाकरे यांची सभा मागितली आहे. यानिमित्ताने फेसबुक पोस्टलाही उधाण आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना आणि भाजपविरोधी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज उमेदवारांनाही राज ठाकरे यांच्या सभेला होणार्‍या गर्दीचा आधार वाटू लागला आहे.

सातार्‍यात राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे भोसले यांनीही राज ठाकरे यांची सभा मागितली आहे. पहिल्यांदाच राजसाहेब ठाकरे यांची तोफ सातार्‍यात धडधडणार अशा स्वरूपाच्या पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनीही सभा पाटणमध्ये घ्यावी अशी विनंती सुरूवातीला केली होती. पण सातार्‍यातले मध्यवर्ती ठिकाण हे सोयीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या प्रवासाच्यादृष्टीने सोयीचे असल्याचे मनसे नेत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पटवून दिले आहे. त्यामुळे आता पाटणऐवजी सभा सातार्‍यात मध्यवर्ती ठिकाणी होणार आहे. सातार्‍यातील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील हे मूळचे पाटणचे आहेत. पाटणमध्ये असलेला त्यांचा दबदबा पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाटणमध्ये सभा अपेक्षित होती. पण खंडाळा, महाबळेश्वर, वाई परिसरातील लोकांना तसेच कराड आणि पाटणमधील लोकांना सातारा प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे ठरेल याच अंदाजाने सभा आता सातार्‍यात लावली आहे. उदयनराजे भोसले यांनी जशी सातार्‍यात सभा मागितली आह

- Advertisement -

तशीच सभा राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील, सुनील तटकरे, स्वाभीमानी पक्षाचे राजू शेट्टी आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनीही सभा मागितली असल्याचे कळते. मुंबईत काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये एकनाथ गायकवाड तसेच उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी मनसे नेते आणि पदाधिकार्‍यांनी खुल्या दिलाने पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस नेतृत्वाने केलेला विरोध पाहता फक्त राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठीच राज ठाकरे सभा घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चार सभा घेण्याची संजय पाटील यांची मागणी
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, त्यांच्या सभांना होत असलेली प्रंचड गर्दी लक्षात घेऊन ईशान्य मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी संजय दिना पाटील यांनी त्यांच्या मतदार संघात किमान चार सभा घ्याव्यात अशी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. राज ठाकरे यांच्या सभा माझ्या मतदार संघात झाल्यास त्याचा चांगला फायदा होईल, त्यांनी आमच्या भागात यावे, अशी माझी इच्छा असली तरी यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रसेच ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचा अपवाद वगळता एकही पट्टीचा वक्ता नाही. ही वाईट स्थिती आहे. (मु्द्यांशी सहमत नाही, वकृत्वाचे कौतुक आहे)
-विश्वंभर चौधरी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -