घरमुंबईमुख्यमंत्री फडणवीस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येणार; महायुतीमधील कटुता मिटणार?

मुख्यमंत्री फडणवीस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येणार; महायुतीमधील कटुता मिटणार?

Subscribe

सत्ता स्थापनेचा दावा करत असताना शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मागितल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद उफळला होता. मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री स्वतः येणार असल्यामुळे दोन्ही पक्षातील कटुता कमी होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कात येऊन बाळासाहेबांना वंदन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आपलं महानगरला मिळाले आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कात येणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे काही वरिष्ठ नेते असण्याचीही शक्यता आहे. सत्ता स्थापनेचा दावा करत असताना शिवसेनेने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मागितल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद उफळला होता. मात्र स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री स्वतः येणार असल्यामुळे दोन्ही पक्षातील कटुता कमी होईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आज सकाळपासूनच शिवाजी पार्क येथे विविध पक्षांचे नेते स्व. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिवाजी पार्कवर हजेरी लावली. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक स्मृतीस्थळावर येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे देखील दुपारच्या दरम्यान शिवाजी पार्कवर येणार असल्याचे समजते. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून बाळासाहेबांना अभिवादन देखील केले आहे.

- Advertisement -
हेही वाचा: ‘स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी दिला’

शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र भाजपकडून अजूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. तसेच येत्या १६ नोव्हेंबरला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांना भेटणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट पुढे ढकलण्यात आली. त्याचप्रमाणे किमान समान कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट होणार होती, मात्र ती देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडून विलंब होत असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे, तर भाजप या विलंबाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवाजी पार्कातली भेट महायुतीमध्ये पुन्हा चर्चा सुरु करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, अशी शक्यता आहे.

एक प्रतिक्रिया

  1. Balasaheb has always helped Sharad pawars family. But surprisingly no buddy visited Shivaji park from Pawar’s family.
    Even all media has one word on it.
    No tv chanel is talking about this.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -