घरमुंबईदगडाला उत्तर ड्रोनने, अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महापालिकेची शक्कल

दगडाला उत्तर ड्रोनने, अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी महापालिकेची शक्कल

Subscribe

कॅमेरा ड्रोनद्वारे प्रक्रियेवर लक्ष ठेवताना दहिसर नदीच्या काठावरील ९५ अनधिकृत इमारती हटवण्यात आल्या होत्या, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनच्या माध्यमाने या भागात लक्ष ठेवण्यात आले होते.

महानगरपालिकेने मीरा रोड येथे ३५ प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. दहिसर नदीकाठी नुकत्याच झालेल्या अनधिकृत इमारतींना हटवण्याच्या मोहिमेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रथमच संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरांचा वापर केला होता. या दरम्यान नागरी समितीने सांगितले आहे की, या उपक्रम मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखरेख करण्यात आली होती.

का केली कारवाई?

महापालिकेकडून ११ फेब्रुवारी रोजी, दहिसर नदीच्या रूंदीकरणासाठी या परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. यावेळी कॅमेरा ड्रोनद्वारे प्रक्रियेवर लक्ष ठेवताना दहिसर नदीच्या काठावरील ९५ अनधिकृत इमारती हटवण्यात आल्या होत्या, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ड्रोनच्या माध्यमाने या भागात लक्ष ठेवण्यात आले होते. यावेळेस कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मोहीम पूर्ण करण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. “हा भाग पाहिला असता येथे अधिक वरदळ दिसून येते. या परिसरात अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत असताना येथील लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते, काही लोकांनी तेथे उभारलेल्या भींतीचा गैरफायदा घेत अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ड्रोनचा वापर केल्याने अधिकारी लक्ष ठेऊन आहेत या भीतीने येथे कोणताही असा प्रकार निदर्शनास आला नाही,” असे सहाय्यक नगरपालिका आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पालिकेची दहिसर विभागातील कारवाई ही येथील नदीचे रुंदीकरण करण्यासाठी करण्यात आली होती. तसेच महानगरपालिकेने मीरा रोड येथील ३५ प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. महापालिकेच्या दहिसर येथील कारवाईनंतर नागरी संस्था आता स्टॉर्मवॉटर विभागाच्या मदतीने २२५ मीटर लांबीची एक भिंत येथे बांधणार आहेत. यावर्षी, महापालिकेने दहिसर नदीभोवती ९५, विक्रोळी येथे २५, भांडुप येथे ३५, एलबीएस रोड येथील ६१ आणि वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील सुमारे १०२ अशी बेकायदा अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -