घरCORONA UPDATEमहापालिकेकडे ३ हजार रेम्डेसिव्हिर इंजेक्शनचा साठा

महापालिकेकडे ३ हजार रेम्डेसिव्हिर इंजेक्शनचा साठा

Subscribe

कोविडच्या विषाणूरोधी अर्थात अँटीव्हायरसचा प्रादुर्भाव रोखून रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी टोसिलिझुमॅब आणि रेम्डेसिव्हिर यासारख्या औषधांची मागणी होत असून मुंबई महापालिकेला यातील ३ हजार रेम्डेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा रविवारी करण्यात आला आहे. मात्र, हा साठा केवळ तीन ते चार दिवस पुरेल इतकाच असला तरी अजून १५ हजार इंजेक्शन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे उर्वरीत इंजेक्शनचा साठा लवकरच प्राप्त होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच समर्पित उपचार केंद्रांमध्ये दाखल असलेल्या कोविड बाधित रुग्णांना अधिक परिणामकारक वैद्यकीय उपचार मिळावेत, याकरता दर महिन्याला आवश्यक असणाऱ्या औषधांची गरज लक्षात घेऊन टोसिलिझुमॅब, रेम्डेसिव्हिर यासारख्या आवश्यक त्या औषधांचा महिन्याभरासाठीचा अग्रीम आणि पुरेसा साठा रुग्णालयांनी आपापल्या स्तरावर संबंधित प्रक्रियेनुसार उपलब्ध करून घ्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त दिले होते. परंतु या दोन्ही औषधांचा तुटवडा आहे. टोसिलिझुमॅब हे केवळ एक इंजेक्शन रुग्णाला देता येते आणि इंजेक्शनची किंमत जास्त आहे. तर रेम्डेसिव्हिर हे रुग्णाला आठ वेळा द्यावे लागते. सध्या या इंजेक्शनची मागणी जास्त असल्याने त्याचा तुटवडा निर्माण होत आहे. मात्र, यातील हेल्डो लॅबस कंपनीकडून ३१२५ रेम्डेसिव्हिर इंजेक्शन महापालिकेला प्राप्त झाली आहेत.

- Advertisement -

मुंबईत दरदिवशी रेम्डेसिव्हिर या इंजेक्शनचा डोस ४०० ते ५०० रुग्णांना देणे आवश्यक असते. या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या इंजेक्शनचा डोस महत्वाचा मानला जातो. त्यामुळे सर्व रुग्णालयांकडून याची औषध उत्पादकांकडून खरेदी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असून महापालिकेच्या वतीने १५ हजार ८०० इंजेक्शनसाठी निविदा मागवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -