घरताज्या घडामोडी'महाजॉब्स': भूमिपुत्रांना नोकरीत मिळणार प्राधान्य, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘महाजॉब्स’: भूमिपुत्रांना नोकरीत मिळणार प्राधान्य, ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

'महाजॉब्स' पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध व्हावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भुमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात, उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार. या समन्वयातून राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होतांना घराघरात समाधान नांदावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच स्थानिक भूमिपुत्रांनांच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक मराठी भूमिपुत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की आणखी काही, महाराष्ट्राने नेहमीच देशाला पारदर्शी आणि भव्यदिव्य स्वरूपाचे काम करून दाखवले आहे, असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तूरा असल्याचे नमूद केले. तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी’, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील युवकांसाठी मोबाईलवर “महाजॉब्स” नावाचे ॲप  उपलब्ध करून देण्याची सूचनाही उद्योग विभागाला यावेळी दिली.

- Advertisement -

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्यासह उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, राज्याच्या प्रत्येक भागातील उद्योजक आणि रोजगार संधीच्या शोधात असलेले भुमिपुत्र या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महाजॉब्स 1
उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे

मुख्यमंत्र्यांनी महाजॉब्स या पोर्टलचे लोकार्पण करताना सांगितले की, ‘हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण, किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. अडचणींची दखल घेऊन पोर्टलच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध करून दिले गेले हे ही सांगितले जावे. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा.  हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे’, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पोर्टलच्या माध्यमातून उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा भागवाव्यात

महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भुमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे. तर युवकांना रोजगार या समन्वयातून  राज्याचा गतिमान पद्धतीने विकास होताना घराघरात समाधान नांदावे, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.

कामगार कपात करू नये

रविवारी हॉटेल व्यावसायिकांची आणि कामगारांसंबंधीची बैठक घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसारख्या औद्योगिक पट्टयापुढे अजूनही कोरोनाचे संकट आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आपण राज्यात नवीन गुंतवणूकीला निमंत्रण देत आहोत. त्यांच्यासमवेत सामंजस्य करार करताना त्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोरोनामुळे परराज्यातील अनेक कामगार त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे राज्यात नोकऱ्या उपलब्ध होत आहेत. पण, कामगार नाहीत अशी स्थिती एकीकडे आहे तर दुसरीकडे काही उद्योग  कामगार कपात करत आहेत. हे अजिबात योग्य नाही. उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. अशावेळी कामगार कपात करणे योग्य नाही. उद्योग विभागाने या सर्व उद्योजकांशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वस्त करावे’, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


हेही वाचा – हे सरकार आम्ही पाडणार नाही, ते अंतर्विरोधाने पडेल – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -