घरताज्या घडामोडीयंदा मालमत्ता कराची रेकॉर्ड ब्रेक कर वसुली

यंदा मालमत्ता कराची रेकॉर्ड ब्रेक कर वसुली

Subscribe

मुंबईत गेल्या २ वर्षांपासून मुक्कामी असलेल्या कोविडच्या प्रादुर्भावाची तमा न बाळगता महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाने यंदा रेकॉर्डब्रेक ५ हजार ७९२ कोटी मालमत्ता कर वसुली केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता वसुलीत ७०० कोटी रुपयांची (१३.७७%), तर २०२०च्या तुलनेत चक्क १६ हजार कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. वास्तविक, कोविडमुळे गेल्या २ वर्षात अनेक उद्योगधंदे, कंपन्या बंद पडल्या. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय बंद पडले. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. या कोविडचा मोठा फटका कंपन्यांना बसला त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनाही फटका बसला. मुंबई महापालिकेच्या उत्पन्नावरही त्याचा विपरीत परिणाम झाला. मालमत्ता कर वसुलीवरही काहीसा परिणाम झाला होता. मात्र तरीही पालिकेने अथक प्रयत्नांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५ हजार ९१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला होता. तर २०२०-२१ या वर्षात पालिकेने ४ हजार १६१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला होता.

यंदा वसूल केलेला मालमत्ता कर ५ हजार ७९२ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतका असून त्याच्याशी गतवर्षीच्या आणि त्या अगोदरच्या वर्षीच्या मालमत्ता कर वसुलीची तुलना केल्यास २०२०च्या तुलनेत १६ हजार कोटींची तर २०२१ च्या तुलनेत ७०० कोटींची वाढ झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून मुंबईत ५०० चौरस फूटापर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. तरीही कर संकलनात झालेली घसघशीत वाढ पाहता करनिर्धारण आणि संकलन खात्याची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, २४ पैकी ३ प्रशासकीय विभागांनी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे. यात जी/दक्षिण विभागाने ३४.३४ टक्के इतकी वाढ नोंदवून अग्रस्थान पटकावले आहे.

- Advertisement -

या मालमत्ता कर वसुलीचे खरे श्रेय पालिका आयुक्त इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू आणि सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास मोटे आणि त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाते.

मालमत्ता कर न भरणाऱ्या ५ हजार ८२१ मालमत्तेवर अटकावणीची कारवाई

मालमत्ता कर वसुलीसाठी विविध स्तरीय कारवाई करण्यात आली. वारंवार विनंती करुनही आणि नोटीस देऊन देखील मालमत्ता कर रकमेचा भरणा महापालिकेकडे न करणाऱ्या ५ हजार ८२१ मालमत्तेवर अटकावणीची (Property Attachement) कारवाई करण्यात आली. तर, १०१ जल जोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्यासोबत आवश्यक तिथे वाहने, वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई देखील करण्यात आली.

- Advertisement -

५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी देऊनही ७०० कोटींची वाढ

पालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने मुंबईकरांना ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) आणि त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी इमारती/निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट दिली. १६ लाख १४ हजार निवासी सदनिकाधारकांना त्याचा लाभ झाला आहे. सवलतीचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरवत आणि कर संकलनावर कोणताही विपरित परिणाम न होऊ देता महानगरपालिका प्रशासनाने आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे.


हेही वाचा – Water Supply : कुर्ल्यातील काही भागात ५ एप्रिलला कमी दाबाने पाणीपुरवठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -