घरमुंबईमुंबई महापालिका निवडणूक घेण्यावर ठाम; राज्य निवडणूक आयोगाने दिले तयारीला लागण्याचे आदेश

मुंबई महापालिका निवडणूक घेण्यावर ठाम; राज्य निवडणूक आयोगाने दिले तयारीला लागण्याचे आदेश

Subscribe

राज्य निवडणूक आयोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक अयोगाशी चर्चा करून जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय जाहीर करणार आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका यंत्रणेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्य निवडणूक आयोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक अयोगाशी चर्चा करून जूनच्या पहिल्या आठवड्यातच याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पालिकेचे संबंधित अधिकारी यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची ऑनलाईन बैठक पार पडली.

मागील २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादांमुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात केंद्रात, राज्यात व पालिकेत काडीमोड झालेला आहे. त्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता एकहाती मिळवायची आहे. मागच्यावेळी त्यांची संधी हुकली. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकीसाठी आतुर झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. मनसे, समाजवादी, राष्ट्रवादी यांनासुद्धा मुंबई महापालिका निवडणुका हव्या आहेत.

- Advertisement -

मुंबईत अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेची निवडणूक वेळेत होणार की पुढे ढकलण्यात येणार, याबाबत शंका निर्माण झाली होती. सर्वपक्षीय नगरसेवकांनाही या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीत लॉटरीद्वारे आरक्षण काढण्यात येणार आहे. तर आवश्यकतेप्रमाणे वार्ड रचनेत बदल केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आरक्षणात काही कमी-अधिक प्रमाण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे समजते.

पालिका निवडणूक यंत्रणेला नवीन मतदारांच्या याद्या व सुधारित मतदार याद्या बनविण्याचे काम त्रासदायक होणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास निवडणुकीत गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यास ऐनवेळी धावपळ करावी लागणार असून त्यासाठी वेगळे नियोजन ठेवावे लागणार आहे. तसेच कोरोनामुळे निवडणूक रद्द झाल्यास मुंबई महापालिकेची मुदत संपताच पालिका बरखास्त करून प्रशासकीय राजवट लागू करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक वेळेवर घेण्याची पालिकेची पूर्ण तयारी असून केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णयाची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -