Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE घरोघरी कोरोना लसीकरण: केंद्राच्या परवानगीसाठी BMC राज्य सरकारच्या दरबारी

घरोघरी कोरोना लसीकरण: केंद्राच्या परवानगीसाठी BMC राज्य सरकारच्या दरबारी

Related Story

- Advertisement -

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे कडक निर्बंध लागून करून कोरोना चाचण्यावर आणि लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. दरम्यान आज मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोनाची लस घेतली. वांद्रे कुर्ला संकुलातील लसीकरण केंद्रात भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस चहल यांनी टोचून घेतला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करण्याची विनंती केली.

कोरोना लस घेतल्यानंतर इक्बाल चहल म्हणाले की, ‘परवा तामिळनाडूमध्ये एकत्रिपणे १० ते १२ रुग्णवाहिका घेऊन एका विभागात गेले आणि २ तासांत त्यांनी ४०० लसीकरण केले. तसेच राजस्थानमध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सिंग स्टाफ घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण करत आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला देखील घरोघरी लस देण्यासाठी परवानगी घ्यावी, अशी राज्य सरकारने केंद्राला विनंती करावी. जर उद्या किंवा परवा केंद्राची परवानगी मिळाली, तर दिवसाला १ लाख लसीकरण केले जाईल, अशी माझी खात्री आहे.’

- Advertisement -

यापूर्वी मुंबई महापालिकेने शारिरीक अपंगत्व असलेल्या जेष्ठ नागरिकांना घरोघरी लस देण्यासाठी केंद्राला मागणी केली होती. पण मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अशी कोणत्याही प्रकारची योजना नसल्याचे कारण देत केंद्राने महापालिकेची मागणी नाकारली होती.

मुंबई काल दिवसभरात ५ हजार ८८८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आजपर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ५६२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मुंबईत कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर एकूण ४७ हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या असून आज ३३ हजार ९६६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ कोटी १ लाख ७ हजार ३१६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Lockdown: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गतच वेगळे मतप्रवाह


 

- Advertisement -