घरताज्या घडामोडीतलाव भरले, पण महापालिका सभेत पावसाळी पाण्याच्या पुनर्वापराबाबत होणार चर्चा!

तलाव भरले, पण महापालिका सभेत पावसाळी पाण्याच्या पुनर्वापराबाबत होणार चर्चा!

Subscribe

मुंबई सुरुवातीच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये पावसाने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले होते. परंतु अवघ्या २० ते २५ दिवसांमध्ये पावसाने अशाप्रकारे धुवाँधार बरसात करत मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व तलाव तुडुंब भरुन टाकली. परंतु सुरुवातीच्च्या काळात मुंबईकरांच्या पाण्याचे संकट होते. त्यामुळे पावसाने मुंबईकरांना तारले असले तरी पाण्याची बचत आणि पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी पाण्याचे स्त्रोत वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वर्षा जलसंचयनाची मागणी नगरसेवकांकडून होत असून महापालिकेच्या सभेत यावर वादळी चर्चा होऊन प्रशासनाला पुन्हा धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पाण्याची भूजल पातळी कमी होत असल्याने पाण्याची समस्या बिकट होत आहे. तसेच भविष्यात पाण्याची समस्या जटील होवू नये म्हणून विकास नियंत्रण नियमावली १९९१मध्ये सुधारणा करून गगनचुंबी इमारतींना तसेच ३०० चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम करणाऱ्या इमारतींना वर्षा जल संचयन अर्थात रेन वॉटर हार्वेस्टींगची योजना राबवणे बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु याची ठोस अंमलबजावणी होत नाही. ही योजना अजुनही कागदावरच आहे. त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डॉ.सईदा खान यांनी महापालिका सभागृहात ६६ (ब) अन्वये चर्चा घडवून आणण्यासाठी महापौरांना पत्र  दिले आहे.

- Advertisement -

माणूस हा पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे जमिनीवर पडणारा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. मुंबईत दरवर्षी दोन धरणांमध्ये साठेल इतके दशलक्ष लिटर पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याकरता जी यंत्रणा महापालिकेकडे उपलब्ध नसल्यामुळे गटारे व नाल्यांद्वारे वाहत जाणारे पावसाचे पाणी समुद्राला मिळते. तेच जर पाणी विविध उपाययोजना करून जमिनीत जिरवले मुंबईकरांना आपत्कालिन परिस्थितीत पाण्याचा एक स्त्रोत उपलब्ध होवू शकतो,असे सईदा खान यांनी आपल्या या निवेदनात म्हटले आहे.

सध्या मुंबईमध्ये रस्त्यांचे होत असलेले सिमेंट काँक्रीटीकरण, ठिकठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक यामुळे जमिनीमध्ये पाणी जिरवण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. त्यादृष्टीने वर्षा जलसंचयनाद्वारे व अन्य आधुनिक उपाययोजनांद्वारे भूजल पातळी वाढवणे आणि पावसाळ्या नदी नाल्यांमागे समुद्राला मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यावर शास्त्रोक्त तथा आधुनिक पध्दतीने प्रक्रीया करून त्याची साठवण पूरप्रवण नसलेल्या ठिकाणी भूमिगत टाक्या बांधून त्यामध्ये करण्यात यावे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत अथवा अन्य काही कारणामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्या पाण्याचा वापर करणे शक्य होईल,असे त्यांनी म्हटले. या ६६ (ब)अन्वये करण्यात येणाऱ्या चर्चेच्या नोटीसवर काँग्रेसच्या नगरसेविका निकीता निकम आणि नगरसेवक बब्बू खान यांनी स्वाक्षरी केलेली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘वजन कमी करण्यासाठी अभिनेत्री घेतात ड्रग्ज’, राखीने केले धक्कादायक खुलासे!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -