घरमुंबईमुंबईकरांचा टोल २०२६ पर्यंत दोनवेळा वाढणार

मुंबईकरांचा टोल २०२६ पर्यंत दोनवेळा वाढणार

Subscribe

मुंबई प्रवेशासाठी २०२७ पर्यंत टोल लागु राहणार

मुंबईत शहरात प्रवेश करताना एकुण पाच एंट्री पॉईंटच्या ठिकाणी सध्या टोल भरावा लागतो. येत्या १ ऑक्टोबरपासून नवीन टोलदर मुंबईत लागू होणार आहेत. पण येत्या २०२६ अखेरीस आणखी दोन वेळा टोलवाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा रस्ते वाहतुकीचा प्रवास आणखी महागणार हे नक्की.

मुंबई एंट्री पॉईंटला सध्या पश्चिम उपनगरात दहिसर, मुलुंड एरोली रोडला एरोलीत, एलबीएस मार्गावर मुलुंड – ठाणे दरम्यान आणि सायन पनवेल हायवेवर सायन येथे टोल आकारणी केली जाते. वर्ष २००२ पासून २५ वर्षांचे दर निश्चित करण्यात आले होते. १ ऑक्टोबर २००२ पासून हे दर निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार येत्या सहा वर्षांमध्ये २०२३ साली तसेच २०२६ साली टोल आकारणी केली जाणार आहे. येत्या ३० सप्टेंबर २०२७ सालापर्यंत हे टोल वाहनचालकांना मोजावे लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दरानुसारच अशा पद्धतीने टोल आकारणी केली जाते. बॉम्बे मोटर व्हेईकल्स अॅक्ट १९५८ नुसार राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला ही टोल वसुली करण्याची जबाबदारी दिली आहे.

- Advertisement -

 

या वाहनांनाच टोलमाफी

१ अॅम्ब्युलन्स
२ अग्निशमन दलाची वाहने
३ पोलिसांची वाहने
४ सरकारी वाहने (लाल आणि भगव्या रंगाचे दिवे) असणारी
५ रक्षा मंत्रालयाची वाहने
६ शववाहिन्या
७ खासदार, विधानसभा, विधान परिषदेचे आमदार

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -