घरताज्या घडामोडीमेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

Subscribe

‘एमएमआरडीए’ने खर्च देण्यापूर्वीच जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेत आहे.

मुंबईत सध्या मेट्रो रेल्वेची काम जोरात सुरू असून या कामांमुळे अनेक ठिकाणी मुंबईकरांना पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिनी फुटल्या जात आहेत. या जलवाहिनी फुटण्याचा हा सिलसिला सुरुच आहे. मात्र, एकाबाजुला महापालिका मेट्रोमुळे फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्त करत आहेत, तर दुसरीकडे मेट्रोच्या कामांमध्ये चक्क जलवाहिन्याही आपल्याच खर्चातून वळते करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.

तब्बल ६५ कोटी रुपये खर्च होणार

बोरीवली पश्चिम येथील लिंक रोडवरील महावीर नगर जंक्शन ते देवकी नगर जंक्शनपर्यंत ३१८० मीटर लांबीची तर दहिसर पश्चिम येथील देवकीनगर जंक्शन ते डी.मार्ट कांदरपाडा येथील २१५० मीटर लांबीची ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी आहे. ही ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी लिंक रोडवरील मेट्रो २-एच्या खांबांच्या खाली येत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी वळवण्याचे काम महापालिकेने हाती घेण्याचा निर्णय घेतला. ही जलवाहिनी वळवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एम.एम.आर.डी.ए.) महापालिकेने कळवले होते. परंतु महापालिकेने स्वत:च हे जलवाहिनी वळवण्याचे काम करावे आणि यासाठीचा खर्च एमएमआरडीएस देईल, असे सांगितले. त्यानुसार महापालिकेने या जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली असून हे काम मेसर्स आर.ए.घुले या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

आजवर लाखो रुपयांचा झाला खर्च

मेट्रोच्या कामांमध्ये आजपर्यंत अनेक जलवाहिनी फोडल्या गेल्या असून महापालिकेने यासर्व जलवाहिन्यांची दुरुस्ती केली आहे. यावर आजवर लाखो रुपयांचा खर्च झाला. परंतु यापैकी अनेक जलवाहिनींचा खर्च ‘एम.एम.आर.डी.ए’ने महापालिकेला दिलेला नाही. मात्र, असे असताना केवळ मेट्रोच्या कामासाठी महापालिका स्वखर्चातून जलवाहिनी वळवण्याचे काम हाती घेत आहे.


हेही वाचा – उभी राहण्यापूर्वी ‘ती’च्या मार्गात अडसर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -