घरताज्या घडामोडीमुंबईत होळीचा बेरंग, ५० जण हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबईत होळीचा बेरंग, ५० जण हॉस्पिटलमध्ये दाखल

Subscribe

करोनाच्या सावटाखाली उत्साहात होळी साजरी होत असताना मुंबईत तब्बल ३८ जणांना वेगवेगळ्या कारणांसाठी पालिकेच्या तिन्ही प्रमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, होळीचा सण मुंबईत बेरंग झाला आहे. मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नऊ जणांवर तर, नायरमध्ये सहा आणि शीव हॉस्पिटलमध्ये एकूण २३ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. तर, केईएम हॉस्पिटलमध्ये एकावर अजूनही उपचार सुरू आहेत. तसंच जे.जे रुग्णालयामध्ये उपाचारासाठी बारा रुग्ण आले होते. त्यातील दोघांना दाखल करून घेण्यात आले, इतरांना पडल्यामुळे जखमा झाल्या होत्या असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

काही जणांना सोडण्यात आले घरी

डोकं, हातापायाला दुखापत आणि हनुवटीला मार, डोळ्याला दुखापत आणि भाजण्याच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. तर, एकावर अजूनही केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आलं असल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. तसंच नायर आणि शीव हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांपैकी प्रत्येकाला ओपीडीमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तिन्ही पालिका हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.

- Advertisement -

यात लहान मुलांचा समावेश 

दरम्यान, या जखमी होणाऱ्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. शीव हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या २३ जखमींपैकी १० लहान मुलं आहेत. तर, केईएममध्ये पाच मुलांवर उपचार करून सोडण्यात आले आहे. अशा एकूण ३८ जणांवर मुंबईत होळीच्या निमित्ताने उपचार केल्याची माहिती तिन्ही पालिका हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – करोनाचं सावट असून मुंबईकरांनी केली रंगांची उधळण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -