घरमनोरंजन'झिरो' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

‘झिरो’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Subscribe

शाहरुख खान याच्या महत्त्वाकांक्षी झिरो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चित्रपटाविरोधातील याचिका मागे घेण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याने दिली आहे.

शाहरुख खान याच्या महत्त्वाकांक्षी झिरो चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाल्याने निर्माता – अभिनेता शाहरुखने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत या विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र आता याचिका मागे घेण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याने दिली आहे. या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात आल्याचे पत्रक कोर्टात सादर करण्यात आले असल्याने ही याचिका मागे घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

वाचा : दिल्लीच्या आमदाराकडून शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल

- Advertisement -

आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी 

शीख समूहाने शाहरुख आणि चित्रपटाने निर्माते त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. झिरोच्या ट्रेलर्समध्ये सिख समूहाच्या भावना दुखावणारे दृश्य असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. त्यामुळे अमृत सिंग खालसा या वकिलाने महिन्याच्या सुरुवातीलाच यासंबंधीची याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये ते सीन हटवण्याची मागणी करण्यात आली होती.  ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने कृपाण धारण केले आहे. शाहरुखच्या गळ्यात नोटांचा हार आणि कृपाण आहे. यावर शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. शीख बांधवांना ज्या पाच वस्तू अनिवार्यपणे धारण करायचे असतात, त्यातील कृपान हे महत्वाचे आहे. शीख बांधव कृपानला वीरता आणि धाडसाचे प्रतिक मानतात. त्यामुळे ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुखने धारण केलेल्या कृपाणवर शीख समुदायाने विरोध केला आहे.

वाचा : शाहरुखचं चाहत्यांना रिटर्न बर्थडे गिफ्ट; ‘झिरो’चा ट्रेलर लाँच!

- Advertisement -

दोन दिवसांवर प्रदर्शन

येत्या शुक्रवारी, २१ डिसंबर २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत सलमान खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ, काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकाण आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री श्रीदेवी देखील या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -