घरमुंबईमुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीतही आता हेरिटेज वॉक

मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीतही आता हेरिटेज वॉक

Subscribe

मुंबई म्हणजे प्रत्येकाशी एक स्वप्ननगरी आहे. मात्र ही स्वप्ननगरी इतिहास आणि संस्कृतीनेही परिपूर्ण आहे. या स्वप्ननगरीत अशी काही स्मारकेही आहेत ज्यांचे ऐतिहासिक महत्त्व आहेत. मुंबईतील अशा ऐतिहासिक स्मारकांची वस्तूंची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीमुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटना (TOGA) यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन संचालनालय (DoT) यांचा संयुक्त विद्यमाने शनिवारी १६ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी मुंबईतील ऐतिहासिक वास्तू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाची सफर करता येणार आहे.

१६ ऑक्टोबर, २०२१ पासून वारसा प्रशंसकांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे दरवाजे उघडत आहे. मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. उच्च न्यायालयाच्या अधिनियम, १८६१ अंतर्गत १४ ऑगस्ट १८६२ रोजी याचे स्थापना करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरू झाले आणि नोव्हेंबर १८७८ मध्ये पूर्ण झाले. १९व्या शतकात ब्रिटिशांनी नेत्रदीपक आणि लक्षवेधी अशा गॉथिक पुनरुज्जीवन शैलीमध्ये ही इमारत साकारली होती. ही इमारत व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल ऑफ बॉम्बेचा भाग आहे, जी २०१८ मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जोडली गेली.

- Advertisement -
मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीतही आता हेरिटेज वॉक
मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीतही आता हेरिटेज वॉक

२०१५ मध्ये उद्घाटन झालेल्या इमारतीचे मुख्य आकर्षण असलेल्या संग्रहालयामध्ये आंतरिक रचना न्यायालयाच्या खोलीप्रमाणे आहे. ही जागा जुनी कायदेशीर रोल, वकिलांची पोर्ट्रेट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका कोपऱ्यात असलेल्या वजा मॉडेलसह तयार केली गेली आहे. १८९० च्या दशकातील, कायद्याच्या अभ्यासासाठी महात्मा गांधी यांचा अर्ज आणि वल्लभभाई पटेल यांचे प्रमाणपत्र आणि पदवीसह त्यांचे १८९१ चे प्रमाणपत्र देखील तेथे प्रदर्शित केले आहे.

पर्यटक आता शनिवार आणि रविवारी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत या ठिकाणी भेट देऊ शकतील. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी १ तास असेल. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये एकूण ३ हेरिटेज वॉक आयोजित केले जातील. सदर हेरिटेज वॉल्कचे शुल्क नाममात्र १०० रुपये (अधिक कर, लागू असल्यास) हेरिटेज वॉक प्रति भारतीय राष्ट्रीय, (देशांतर्गत) पर्यटक/अभ्यागत २०० रुपये (अधिक कर, लागू असल्यास) प्रति आंतरराष्ट्रीय (विदेशी), पर्यटक/अभ्यागत आकारले जातील. पर्यटकांनी bookmyshow.com वर तिकीट बुक करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

वल्सा नायर सिंह, प्रधान सचिव, महाराष्ट्र पर्यटन विभाग, म्हणाल्या, “उच्च न्यायालयाचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तुकला याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विभाग, मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटना (TOGA) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. TOGA अध्यक्ष जेरू भरुचा म्हणाल्या, “बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांसारख्या महान व्यक्तींनी या ठिकाणी कामकाज केले आहे आणि पर्यटकांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांना या सुंदर वस्तूंमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळत आहे. आम्ही टूर मार्गदर्शकांची व्यवस्था केली आहे जे पर्यटकांना हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये मार्गदर्शन करतील. मला आनंद आहे की महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि मुंबई उच्च न्यायालयाने हा पुढाकार घेतला आहे. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती या इमारतीच्या सौंदर्याने आश्चर्यचकित होईल याची मला खात्री आहे.”

हेरिटेज वॉक गेट क्रमांक ४ पासून सुरू होईल, जिथून त्यांना न्यायाधीश ग्रंथालय, सेंट्रल कोर्ट हॉल क्रमांक ४६, न्यायमूर्ती एम सी छागला (मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश) आणि संग्रहालय येथे नेले जाईल. जजेस पोर्च येथे वॉक संपेल. टूर गाईडद्वारे इमारतीच्या वास्तुकले बद्दल सर्व माहिती देखील दिली जाईल आणि पर्यटकांना निवडक ठिकाणी छायाचित्र घेण्याची मुबा असेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -