घरमुंबईपाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना २ कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; ५ जण जखमी

पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती करताना २ कर्मचाऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; ५ जण जखमी

Subscribe

मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. यावेळी पाईपलाईनच काम सुरू असताना पालिकेच्या ७ कर्मचाऱ्यांना वीजेचा धक्का लागला.

मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. यावेळी पाईपलाईनच काम सुरू असताना पालिकेच्या ७ कर्मचाऱ्यांना वीजेचा धक्का लागला. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ५ कर्मचारी जखमी झाले आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. या भागात पाण्याची पाईपलाईन फुटली होती. या पाईपलाईनच्या दुरुस्तीच काम सुरू होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास काम करण्यासाठी कर्मचारी पोहोचले होते. तेव्हा अचानक ७ कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण हे यातून थोडक्यात बचावले असल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्घटनेत गणेश दत्तू (४५) आणि अमोल काळे (४०) या २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जर इतर ५ जण जखमी झाले आहे. नाना पुकळे (४१), महेश जाधव (४०), राकेश जाधव (३९) अनिल चव्हाण (४३), नरेश अधांगळे (४०) अशी जखमींची नावे आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.


स्वतःच्याच रायफलमधून चुकून झाली फायरिंग; घाटकोपरमध्ये शिपायाचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -