घरताज्या घडामोडीकर्जत रेल्वे स्थानकातील कार्ड स्वॅप मशिन बंद

कर्जत रेल्वे स्थानकातील कार्ड स्वॅप मशिन बंद

Subscribe

प्रवाशांना पुन्हा स्थानकाबाहेर जाऊन पैसे घेऊन यावे लागत आहे

कर्जत येथील रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीट बुकिंग काऊंटरवरील कार्ड स्वॅप मशिन कित्येक दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या लसीकरणाचे दोन डोस झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या प्रवासास अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच स्थानकात पास काढण्यासाठी प्रवाशांची गर्दी होत आहे. परंतु स्वॅप मशिन बंद असल्यामुळे प्रवाशांना पुन्हा स्थानकाबाहेर जाऊन पैसे घेऊन यावे लागत आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या कॅशलेस व्यवहार करण्याच्या आदेशाचे रेल्वे प्रशासनाकडून उल्लंघन होत असल्याचे दिसुन येत असून, प्रवाशांनाही त्रास होत आहे. त्यामुळे कार्ड स्वॅप मशिन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी कर्जत रेल्वे पॅसेंजन असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली आहेे. तर या मशिनमधून परस्पर तिकीट काढून लोकलने प्रवास करू नये याकरिता ते बंद ठेवण्यात येत असल्याचे रेल्वेच्या स्थानिक अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

कर्जत-सांडशी फेरीला कर्जत आगाराची मान्यता

कोरोना काळात बंद करण्यात आलेली कर्जत-सांडशी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पोलीस मित्र संघटनेने कर्जत आगार प्रमुख शंकर यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती आणि पाठपुरावाही सुरू होता. अखेर या मागणीला यश येऊन बस पूर्ववत सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. यामुळे या पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गावर सुरुवातीला दररोज ५ बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या बसने नेहमी प्रवास करणार्‍यांनी बसच्या नियोजित ५ फेर्‍या कोणत्या वेळी सोडायला पाहिजे याबाबत संघटनेला कळवावे, मग त्यानुसार त्या सुरू होतील, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे माथेरानमधील घोड्याचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -