घरठाणेबोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल

बोटात अडकलेली अंगठी काढताना ग्राईंडरचा वापर; हॉस्पीटलच्या सहाय्यकावर गुन्हा दाखल

Subscribe

रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाच्या हाताला गँगरीन होण्याचा धोका निर्माण झाला असतानाही उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी चक्क ग्राईंडरचा वापर करणार्‍या ठाण्यातील एक रुग्णालयाच्या सहाय्यकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर संबंधित रुग्णालयाने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यानंतर मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर पाठपुरावा केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी ठाणे येथे राहणाऱ्या पार्थ सतीश टोपले (14) या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती.

अंगठी निघत नसल्याने या मुलाची आई नामे शीतल सतीश टोपले यांनी या मुलाला ३ जुलै २०२१ रोजी खोपट येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकार्‍याने मुलाकडे पाहिले नाही. रुग्णालयात उपस्थित असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन औषधे देऊन या मुलाला घरी पाठविले. त्यानंतर याच रुग्णालयातील स्वप्नील होतकर नामक एका इसमाचा फोन शितल टोपले यांना आला. या इसमाने मी रुग्णालयातून बोलत असून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी आपणाला पाठविले असल्याचे सांगितले.

- Advertisement -

 

शितल टोपले यांनी संमती दिल्यानंतर स्वप्नील होतकर हा शितल टोपले यांच्या घरी आला अन् त्याने आपल्याकडील धारदार ग्राइंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. अंगठी निघत नसल्याने त्याचे पार्थ याचे बोटच कापून काढले. या प्रकारानंतर पार्थ याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथे त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याऐवजी अतिदक्षता विभागामध्ये ठेवून त्याच्या हातावर तसेच पोटावर शस्त्रक्रिया करुन त्याचे कापलेले बोट सुमारे महिनाभर पोटामध्ये ठेवून आता ते त्याच्या हाताला जोडण्यात आले आहे.

- Advertisement -

 

त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाच्या हाताला गँगरीन होण्याचा धोका निर्माण झाला असतानाही उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर मनसेने नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशार्‍यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

हे ही वाचा- कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा भंगारात; केवळ २५ बसेस चालू स्थिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -