घरमुंबईउल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल

उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

उल्हासनगरमध्ये प्रभाग समिती दोनच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात तीन मजल्याची अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी एम. आर. टी. पी. अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर २ येथील बॅरेक क्रमांक ३२३ च्या रूम नंबर ९ या ठिकाणी तीन मजल्याची आरसीसी इमारत बनविण्यात आली आहे. गेल्या एक वर्षापासून या इमारतीचे काम सुरू असून महानगरपालिकेतून यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. मनपाचे प्रभाग क्रमांक २ चे सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी याप्रकरणी सोमवारी इमारतीचे मालक लधाराम ओटनदास मंगलानी यांच्याविरुद्ध उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी एम. आर. टी. पी. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले मनपा आयुक्त?

गेल्या वर्षभरापासून हे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. मात्र याप्रकरणी मालकाला एक नोटीस देण्याव्यतिरिक्त मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. इमारतीचे ३ मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार केली गेली. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बनावट रिस्कबेस प्लॅन तयार करून इमारती बनविल्या जात आहेत. मात्र मनपाचे अनधिकृ बांधकाम निष्कसन नियंत्रक गणेश शिंपी आणि इतर सहाय्यक आयुक्त त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप होत आहे.

उल्हासनगर शहर हे ९० टक्के अनधिकृत आहे. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे परिस्थिती सुधारणार नाही. अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची तो प्रशासनाचा भाग आहे.
– सुधाकर देशमुख (उल्हासनगर मनपा आयुक्त)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -