घरमुंबईकेंद्राने साखर, कांद्या आता अतिरेकीही पाकिस्तानातून आणावेत - उद्धव ठाकरे

केंद्राने साखर, कांद्या आता अतिरेकीही पाकिस्तानातून आणावेत – उद्धव ठाकरे

Subscribe

राज्याच्या जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेत कोणतीही असंतोषाची किंवा नाराजीची भावना नाही. पण देशात घोषित आणीबाणी आहे का ? असा प्रश्न मात्र पडतो. शेतकरी सीमेवर आपल्या न्यायहक्कासाठी बसलेले असताना त्यांच्याशी बोलण, समजून घेणे ही सरकारची भावना नाही. भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसवले जात आहे, त्यांच्या अंगावर गार पाणी टाकले जात आहे. खरी आणीबाणी तर इथे आहे असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणीबाणीच्या निमित्ताने केलेल्या टीकेवर काढला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतरच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलेत होते.

सर्वच नेत्यांना शेतकऱ्यांनाही हे सरकार अतिरेकी, पाकिस्तानी ठरवत आहे. अन्नदात्याला देशद्रोही, अतिरेकी ठरवण हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. पाकिस्तानातून कांदा, साखर आणणाऱ्या केंद्र सरकारने आता अतिरेकीही पाकिस्तानातूनच आणावेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. अन्नधान्य पिकावणारा शेतकरी आपल्या शेतात अन्नधान्य पिकावणारा आपल्या हक्काची लढाई लढतो आहे. अशावेळी तुम्ही मात्र हक्क हिरावून घ्यायला निघालात. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना कायद्याचा चांगला अर्थ कळला असेल तर त्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात जाऊन त्या कायद्याचा अर्थ समजावून सांगावा अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

ईडीचा वापर घर कामगारासारखा

अंमलबजावणी संचलनालय (ईडी) चा वापर केंद्र सरकार हे घर कामगारासारखा करत आहे. महत्वाचे म्हणजे हा प्रकार सगळ्या राज्यात सुरू आहे. त्यामुळेच खरी आणीबाणी कुठे सुरू आहे हे केंद्र सरकारलाच विचारण्याची वेळ आली आहे असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. देशाची जनता जागृत आहे आणि सत्तेचे खेळ बघते आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने आता जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -