मध्य रेल्वेने ब्रॉडगेज मार्गावर १००% विद्युतीकरणाचा टप्पा गाठला, हरित रेल्वेच्या दिशेने वाटचाल

मुंबई : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. वर्ष 2030 पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे वाटचाल करत आहे.

मध्य रेल्वेने सर्व ब्रॉडगेज मार्गांवर (3825 मार्ग किलोमीटर) 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य केले आहे. मध्य रेल्वेचा शेवटचा नॉन-इलेक्ट्रीफाइड सेक्शन म्हणजेच सोलापूर विभागातील औसा रोड- लातूर रोड (52 RKM) चे दि. 23.02.2023 रोजी विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले.

मध्य रेल्वेने आता सर्व ब्रॉडगेज मार्गांवर पूर्णपणे विद्युतीकरण केल्याने दरवर्षी 5.204 लाख टन कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात मदत झाली आहे आणि वार्षिक रु. 1670 कोटींची बचत देखील झाली आहे. पर्यावरणास अनुकूल आणि प्रदूषण कमी करणारी रेल्वे विद्युतीकरणाची गती 2014 पासून 9 पट वेगाने वाढली आहे. रेल्वेने ब्रॉडगेज मार्गांचे विद्युतीकरण नियोजित केले आहे, यामुळे डिझेल ट्रॅक्शन काढून टाकणे (हटवणे) सुलभ होईल व कार्बन फूटप्रिंट आणि पर्यावरणीय प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

आद्य रेल्वे, जिथे भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन दि. ०३.०२.१९२५ रोजी हार्बर मार्गावरील तत्कालीन बॉम्बे व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि कुर्ला दरम्यान चालली. या विभागाचे 1500 व्होल्ट डीसीवर विद्युतीकरण करण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील डीसी ट्रॅक्शनचे एसी ट्रॅक्शनमध्ये रूपांतर 2001 मध्ये सुरू झाले आणि उत्तरोत्तर, देशाच्या जीवनरेषेला, म्हणजे उपनगरीय सेवांना कोणताही अडथळा न येता, 2016 मध्ये पूर्ण झाले. याद्वारे वर्षानुवर्षे ट्रॅक्शन, घाट विभाग इ. मधील DC-AC चे रुपांतर करण्याच्या आव्हानांवर मात करण्यात आली आहे. मध्य रेल्वे धोरणात्मकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी स्थित आहे आणि ती बहुतेक भारतीय शहरे आणि इतर स्थानांना त्याच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख शहरांशी जोडते जसे की, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर इ. पंजाब मेल, हावडा मेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ह. निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस, कोकण कन्या एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस इत्यादी या मध्य रेल्वेच्या नेटवर्कवर धावणाऱ्या प्रमुख प्रतिष्ठित गाड्या आहेत. मध्य रेल्वे उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाइन इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवते.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी म्हणाले की, “रेल्वे हे पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर आणि प्रवाशांचे आधुनिक वाहक असून नव्या भारतातील प्रवाशांच्या व मालवाहतुकीच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करते. यामुळे इंधनाच्या बिलातही लक्षणीय घट होईल आणि कार्बन फूटप्रिंट्स मिळतील.”

विद्युतीकरणाचे खालील फायदे
• पर्यावरण-अनुकूल वाहतुकीचे साधन
• आयात केलेल्या डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी केले, ज्यामुळे मौल्यवान परकीय चलनाची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होतात.
• कमी ऑपरेटिंग खर्च.
• अवजड मालवाहतूक गाड्या आणि इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या उच्च क्षमतेच्या प्रवासी गाड्या आणि थ्रूपुट वाढवते.
• कर्षण बदलामुळे अडथळा टळून विभागीय क्षमता वाढते.