घरमुंबईदादर-माटुंगा दरम्यान नाईट 'ब्लॉक'

दादर-माटुंगा दरम्यान नाईट ‘ब्लॉक’

Subscribe

नविन रुट रिले कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील दादर ते माटुंगा स्थानकादरम्यान रात्री ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या आणि जलद मार्गांवर रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १३ ते १८ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने रात्रीच्या वेळी ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. नविन रुट रिले कामासाठी मध्य रेल्वे मार्गावरील दादर ते माटुंगा स्थानकादरम्यान रात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते भायखळा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार असून त्या विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी येथे थांबणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

असा होणार गाड्यांवर परिणाम

गुरुवारी रात्री १२.५० तेपहाटे ५ वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदम्यान सीएसएमटीहुन कुर्लासाठी सुटणारी रात्री ११.४८ची लोकल आणि कुर्ला-सीएसएमटी रात्री १२.३१ची लोकल रद्द असणार आहे.

- Advertisement -

तसेच कुर्ला स्थानकातून सीएसएमटीसाठी गुरुवारी पहाटे ४.५१ आणि ५.५४ची लोकल रद्द करण्यात आली आहे.

तर सीएसएमटी स्थानकातुन डोंबिवली रात्री.१०.१८वाजता दादर ते डोंबिवली रात्री.१०.४८वाजता, कल्याण ते दादर रा.११.१२ ची लोकल कुर्ला स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.

- Advertisement -

गुरुवारी पहाटे ५.२४ ची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल विद्याविहार स्थानकातुन पहाटे ५.५५ ला सुटणार आहे. याशिवाय रात्री १२.३६ ते पहाटे ४.५६ वाजेपर्यत अप आणि डाउन धिम्या मार्गावरील लोकल अपडाऊन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

तसेच शनिवारी रात्री ११.१५ ते सकाळी ६ वाजेपर्यत अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसमध्ये रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ५११५४ भुसावळ-सीएसएमटी पॅसेंजर, ५११५३ सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, २२१०६-२२१०५ पुणे-सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस रद्द असणार आहेत.

तसेच सीएसएमटी-कल्याण रात्री.९.५४ आणि कल्याण-सीएसएमटी रात्री.११.५ ची लोकल रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल गाडयांची वाहतुक अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

रविवारी रात्री १२.१५ ते पहाटे ५.३० वाजेपर्यत अप-डाउन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसला रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील वाहतुक अप धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे.

सोमवारी रात्री १२.४५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यत, दादर टर्मिनसला राभी १२.४५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी-ठाणे रात्री.१०.३८ आणि रा.१२.२८ ची ठाणे-सीएसएमटी लोकल, सीएसएमटी-कुर्ला रात्री १२.३१ ची लोकल रद्द असणार आहे.

तर पहाटे ४ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल, कुर्ला-सीएसएमटी पहाटे ४.५१ आणि ५.५४ ची लोकल रद्द केली आहे.

बदलापुर-सीएसएमटी रात्री.९.५८ आणि रात्री.११.३१ ची लोकल कुर्लास्थानकापर्यत, खोपोली-सीएसएमटी रात्री.१०.१५ ची लोकल ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. सीएसएमटी-कसारा. पहाटे ४.१५ आणि सकाळी ६.०२ ची लोकल कुर्लास्थानकातुन धावणार असून सीएसएमटी-कर्जत पहाटे ५.२० ची लोकल ठाणे स्थानकातुन धावणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -