घरदेश-विदेशमोदी सरकार करणार ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा?

मोदी सरकार करणार ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा?

Subscribe

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता भाजप सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसह पाच राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता भाजप सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार ४ लाख कोटी रूपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे. ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय झाल्यास देशातील २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. यावेळी भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागल्याची शक्यता आहे. शिवाय, सरकारनं शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस धोरणं राबवली नाहीत असा देखील सूर सध्या देशात पाहायाला मिळत आहे. त्याचा तोटा हा भाजपला पाच राज्यांमध्ये बसला आहे. त्यामुळे या पराभवातून धडा घेत आता मोदी सरकार ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांशी देखील संवाद साधणार आहेत. काँग्रेसनं देखील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती.

हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपला मतदारांनी नाकारलं. त्यामुळे भाजपमध्ये मोठी खबळळ उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकार शेतकरी कर्जमाफीचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी, युवक, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी  मोदी सरकार पावलं उचलणार असल्याची माहिती देखील आता समोर येत आहे.

- Advertisement -

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये या निकालाचे परिणाम जाणवू नयेत म्हणूत भाजपनं वेळ न दवडता पावलं उचलायला सुरूवात केली आहे. त्यासाठी शेतकरी कर्जमाफी केली जाऊ शकते. दरम्यान, त्याचा निर्णय तरी अद्याप झालेला नाही.

वाचा – भाजपचे विमान जमिनीवर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -