घरमुंबईट्रेनमध्ये उघडणार 'शॉपिंग सेंटर'

ट्रेनमध्ये उघडणार ‘शॉपिंग सेंटर’

Subscribe

शॉपिंग कार्टची ही सुविधा मध्य रेल्वेवर सुरु होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय प्रवाशांचाही वेळ वाचणार आहे.

मुंबईकरांचा अर्धावेळ हा प्रवासात जात असतो आणि त्यातही तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर बराचवेळ त्यात निघून जातो. हा प्रवास करता करता तुम्हाला शॉपिंग करता आली तर? हा म्हणजे आताही ट्रेनमध्ये शॉपिंग सुरुच असते. पण आता तुम्हाला अधिकृतरित्या ट्रेनमध्ये शॉपिंग करता येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने एक नवा प्रस्ताव आणला असून त्यामुळे मध्य रेल्वेला आर्थिक फायदा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अमेझॉन- फ्लिपकार्टला देणार टक्कर ‘गुगल’ची शॉपिंग वेबसाईट

काय आहे रेल्वेची शॉपिंग योजना ?

लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनेकदा आपल्याला काही गोष्टींची गरज भासते. अनेक गोष्टी आपण घ्यायला विसरतो. त्यामुळे रेल्वेने शॉपिंग कार्टची योजना आणली असून या योजनेंतर्गत गाडीमध्ये दोन सेल्समन असणार आहेत. जर तुमच्याकडे कॅश नसेल तर तुम्ही डेबिड, क्रेडिट कार्डने पेमेंट करु शकता. ट्रेनमध्ये ही सुविधा २०१९ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. प्रवासात विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या सामानाचे कॅटलॉग बनवण्यात येणार आहे. ते कॅटलॉग प्रवाशांना देण्यात येईल त्यामुळे वस्तू निवडणे सोपे जाणार आहे. या वस्तूंमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, सिगरेट, गुटखा अशा वस्तू मिळणार नाहीत.

- Advertisement -
ऑनलाईन शॉपिंग करताना ही काळजी घ्या!!

मध्य रेल्वेवर सुरु होणार सुविधा?

शॉपिंग कार्टची ही सुविधा मध्य रेल्वेवर सुरु होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय लोकांनाही या योजनेमुळे शॉपिंग बसल्या जागी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन ट्रेनमध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे. यात मुंबई- अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस या गाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यासाठी एचबीएन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ५ वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -