घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेवर करा १० रूपयात एसी लोकलचा प्रवास

मध्य रेल्वेवर करा १० रूपयात एसी लोकलचा प्रवास

Subscribe

मध्य रेल्वेने दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर एसी लोकलसाठी १० रूपयांपासून ते ६० रूपयांपर्यंत तिकिट असावे असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला आहे...

एअर कंडीश्नर लोकल अधिकाधिक प्रवासी आकर्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने आता सेंकड क्लासच्या प्रवाशांनाही एसी लोकला पर्याय देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत एसी लोकलच्या प्रवासापासून वंचित राहणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावामुळे आता सेकंड क्लासच्या प्रवाशांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. त्यासाठी वेगवेगळा तिकिटाचा दरदेखील मध्य रेल्वेकडून प्रस्तावित करण्यात आला आहे.

असा आहे प्रस्ताव 

मध्य रेल्वेने सुरू केलेल्या लोकल ट्रेनसाठी मिळणार कमी प्रतिसाद पाहूनच आता सेकंड क्लासच्या प्रवाशांनाही एसी प्रवासाचा पर्याय देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एसी लोकल सुरू केली होती. पण या लोकलला तितकासा प्रतिसाद मिळत नाही हे पाहूनच आता मध्य रेल्वेने हा प्रस्ताव पुढे केला आहे. मध्य रेल्वेकडून सध्या १२ एसी लोकलच्या फेऱ्या करण्यात येत आहेत. मध्य रेल्वेला एसी लोकल चालवताना नॉन एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये कपात करावी लागली आहे. तसेच मध्य रेल्वेला चार एसी लोकल मंजुर होऊनही अवघी एक लोकल मध्य रेल्वेकडून चालवण्यात येत आहे. एका लोकलला मिळणारा कमी प्रतिसाद पाहूनच मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठी नवीन तिकिटाचे दर लागू करावे असा प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

असे आहेत प्रस्तावित तिकिटाचे दर

सध्याच्या फर्स्ट क्लासच्या प्रवासापेक्षा एसी लोकलचा दर हा १.३ पट ते २.६ पट अधिक आहे. सध्या मुंबई उपनगरीय लोकलमध्ये १० टक्के प्रवासी हे फर्स्ट क्लासने प्रवास करतात. तर ९० टक्के प्रवासी हे सेकंड क्लासने प्रवास करतात. त्यामुळेच एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद हा अतिशय तुटपुंजा आहे. सध्याचे एसी प्रवासाचे दर हे फर्स्ट क्लासच्या तिकिटा इतके असावेत असेही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने बोर्डाला कळविले आहे. सध्याच्या एसी लोकलमध्ये फर्स्ट आणि सेकंड क्लास अशी वर्गवारी केली तर सेकंड क्लासच्या प्रवाशांनाही एसी लोकलचा पर्याय मिळू शकेल असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या दिल्ली मेट्रोच्या दरांनुसार एसी प्रवासासाठी १० रूपये ते कमाल ६० रूपये असा असावा असेही रेल्वेकडून सुचवण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहूनच अधिक एसी लोकल आणता येतील असा मध्य रेल्वेचा मानस आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -