घरमुंबईमध्य रेल्वेच्या 'या' गाड्यांचे स्टॉप बदलले

मध्य रेल्वेच्या ‘या’ गाड्यांचे स्टॉप बदलले

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेग मर्यादेत वाढ केल्याने बऱ्याच गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यासह मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांच्या ठिकाणांतही बदल केला जाणार आहे

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धक्काबुक्की, लेट मार्क, गैरसोय या सर्व समस्यांमुळे नेहमीच मनस्ताप सहन करवा लागतो. मात्र आता मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसेच मध्य रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेग मर्यादेत वाढ केल्याने बऱ्याच गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यासह मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांच्या ठिकाणांतही बदल केला जाणार आहे. मध्य रेल्वेने सुमारे २२ गाड्यांचे १ जुलै पासूनचे आगाऊ आरक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वेग मर्यादेत वाढ केल्याने संबंधित बदल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. चेन्नई एक्सप्रेस आणि हुबळी एक्सप्रेसच्या मुंबईतून सुटणाच्या ठिकाणात बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे यापूर्वी दादरवरून सुटणारी चेन्नई एक्सप्रेस १ जुलैपासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणारी हुबळी एक्सप्रेस १ जुलै पासून दादर वरून सुटेल.

- Advertisement -

दरम्यान, एलटीटी-हजरत निझामुद्दीन एसी एक्सप्रेस या एकमेव गाडीचे आगाऊ बुकिंग ३० जून पासून करता येईल. मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णायाचा मोठा फटका महाराष्ट्रातील दादर-मडगाव, नागपूर-पुणे, सीएसएमटी-पंढरपूर, सीएसएमटी-शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -