घरताज्या घडामोडी२० मिनिटात पकडले...२४ दिवसात फाशी

२० मिनिटात पकडले…२४ दिवसात फाशी

Subscribe

एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीला २० मिनिटात अटक करुन त्याला आता २४ दिवसात फाशी देण्यात येणार आहे.

झारखंड येथील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना यश आले. ३ मार्चला ‘त्या’ आरोपीला झारखंडच्या दुमका सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या मुख्य आरोपीसोबत इतर दोन आरेापींचा नाव, पत्ता सुध्दा झारखंड पोलिसांना दिला होता. महात्मा फुले पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २० मिनिटात फोटोच्या आधारे आरोपी मिठू रॉय याला अटक केली होती. पोलिसांच्या या कामगिरी बद्दल बुधवारी कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, सुरेश डांबरे, दीपक सरोदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

कल्याणच्या पेालिसांचे डीसीपीकडून कौतुक

दरम्यान, झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ फेब्रुवारीला एका सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिचा मृतदेह पुरण्यात आला होता. हा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिठू रॉय हा फरार झाला होता. त्यादरम्यान दुमका पेालिसांना माहिती मिळाल्यानुसार, मिठू हा मुंबईच्या दिशेने पळाला होता. त्याच माहितीच्या आधारे दुमका पोलीस ठाण्याचे एस.पी.रमेश यांनी कल्याण पोलिसांना संपर्क साधला. ज्या ट्रेनमध्ये आरोपी बसला होता. ती ट्रेन २० मिनिटांत कल्याण स्टेशनला पोहोचणार होती. पोलिसांकडे अवघे २० मिनिटे हेाती. या २० मिनिटात महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याण स्टेशनला रवाना झाले. ८ फेब्रुवारीला कल्याण पोलिसांनी फोटोच्या आधारे आरोपी मिठू रॉय याला पकडले. अवघ्या २० मिनिटात केवळ फोटोच्या आधारे पोलिसांनी आरोपी मिठू याला अटक केली. आरोपी मिठू रॉय याला पोलीस हिसका दाखवताच त्यांनी पंकज मोहाली आणि अशोक रॉय या दोघांचा नाव आणि पत्ता पोलिसांना सांगितला. तसेच घटनेच्या २४ दिवसात या प्रकरणाची सुनावणी करून दुमका सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांच्या कामगिरीमुळेच बलात्कारीत गुन्ह्यातील आरोपींना अटक होऊन त्यांना शिक्षा झाली.

- Advertisement -

हेही वाचा – डॉ. नितीन महाजन यांची सीबीआयमार्फत चौकशी करा, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -