घरमुंबईवरळीतील सासमिरा येथे रसायन गळती; 4 जण जखमी

वरळीतील सासमिरा येथे रसायन गळती; 4 जण जखमी

Subscribe

इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत ग्लिसरीनने भरलेली टाकी लीक झाल्याने ही घटना घडली.

मुंबईमधील वरळी येथील सासमिरा इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन अँड टेक्स्टाइल संस्थेमध्ये रसायन गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत रसायन गळती झाल्याने चार जण होरपळे आहेत. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारांसाठी आधी मुंबईतील जसलोक रुगालयात पाठविण्यात आले जसलोक रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत तर अधिक उपचारांसाठी त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथे असलेल्या बर्न सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. (Chemical leak at Sasmira in Worli; 4 people injured)

हे ही वाचा – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत वरळीमध्ये असलेल्या सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्स्टाइल संस्थेच्या प्रयोगशाळेत आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत ग्लिसरीनने भरलेली टाकी लीक झाल्याने ही घटना घडली. संस्थेच्या चाचणी विभागाच्या मशीनमधून केमिकलची गळती झाली असल्याची माहिती मिळत आहे. भाजलेल्या व्यक्तींमध्ये 2 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. जखमींची नावे श्रद्धा शिंदे (27/ महिला), प्रतिक्षा घुमे (20/ महिला), राजीव कुलकर्णी (60) आणि प्रज्योत वडे (21) अशी आहेत.

मागील महिन्यात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मदर इंडिया कॉलनीमध्ये क्लोरीन गॅसच्या टाकीतून गळती झाली होती, त्यामुळे सर्वत्र गॅस पसरला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. गॅस गळतीमुळे तेथील वस्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण होते. या घटनेत दोन मुलांसह 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी सांगितले होते की, इदगाह वॉटर फिल्टर प्लांटमध्ये पाणी स्वच्छ केले जात होते, त्यादरम्यान सिलेंडरमधून क्लोरीन गॅसची गळती झाली आणि ही घटना गाडली.

- Advertisement -

हे ही वाचा –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -