घरताज्या घडामोडीहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण

Subscribe

सर्वसामान्या नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सर्वसामान्या नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी महापालिका क्षेत्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभारण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. धारावीत उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे लोकार्पण गुरूवारी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Hospital will be inaugurated by the CM Eknath Shinde)

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, स्थानिक आमदार वर्षा गायकवाड, आमदार सुनिल शिंदे व राजहंस सिंह आणि महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे.

- Advertisement -

धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रोड नजिक असणाऱ्या ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ नजिक आयोजित होणाऱ्या समारंभा दरम्यान व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे ५१ ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यात ही संख्या २२० दवाखान्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे दवाखाने उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत पोर्टा केबिनमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. तर काही दवाखाने हे सध्या उपलब्ध असलेल्या दवाखान्यांच्या जागेत सुरु करण्यात येणार आहेत.

या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी तसेच १४७ प्रकारच्या रक्तचाचण्या देखील मोफत करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त एक्स रे, सोनोग्राफी यासारख्या चाचण्यांकरीता पॅनलवर असणा-या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या चाचण्या जरी खासगी केंद्रातून करण्यात येणार असल्या तरी त्या महानगरपालिका रुग्णालयांच्या दरानुसार शुल्क आकारणी करुन करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

- Advertisement -

“सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा नागरिकांना त्याच्या सोयीनुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी उपलब्ध दवाखान्यांमध्ये दुसऱ्या सत्रात आणि मोकळ्या जागेत पोर्टा केबिन स्थापित करुन त्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबर २२ पासून ५१ दवाखाने सुरु करण्यात येत आहेत. पुढील ६ महिन्यात २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरु करण्याकरिता टप्पेनिहाय कार्यवाही सुनियोजितप्रकारे करण्यात येणार आहे. यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण या योजने अंतर्गत एकूण २२० ठिकाणी आरोग्य व वैद्यकीय सुविधा मुंबईकरांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत”, असे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

या वैद्यकीय सेवेचे फायदे

  • नागरिकांना सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होईल.
  • नागरिकांचा औषध उपचारावर खिशातून होणारा खर्च कमी होण्यास मदत होईल.
  • या योजनेअंतर्गत साधारणपणे २५ ते ३० हजार लोकसंख्येसाठी १ दवाखाना, याप्रमाणे पोर्टा केबिनमधील दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत.
  • उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत.
  • प्रत्येक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (MBBS), १ परिचारिका, १ औषध निर्माता आणि १ बहुउद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
  • उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत देण्यात येत आहे.
  • उपलब्ध दवाखान्याची दर्जोन्नती करून (कान-नाक-घसा तज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ञ आदी) विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येणार आहे.

हेही वाचा – विमानप्रवासातील मास्कसक्ती मागे, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून नियम शिथिल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -