Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Indian Railways: रेल्वे प्रवासातील फूड मेनू बदलणार, IRCTCची नवी सुविधा

Indian Railways: रेल्वे प्रवासातील फूड मेनू बदलणार, IRCTCची नवी सुविधा

Subscribe

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच वेगवगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. प्रवाशांची होणारी गैससोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या जेवणाच्या मेन्यूबाबत एक नवी सुविधा आणली आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नेहमीच वेगवगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. प्रवाशांची होणारी गैससोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने प्रयत्न करत असते. अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या जेवणाच्या मेन्यूबाबत एक नवी सुविधा आणली आहे. या सुविधेअंतर्गत मधुमेही रुग्ण, लहान मुले आणि खाद्यप्रेमींना त्यांच्या गरजेनुसार आहार दिला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनला (IRCTC) ट्रेनसाठी फूड मेनू बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. (Indian Railways Ministry Give Permission To IRCTC Will Change Of Food Menu Of Railways)

या नवीन फूड मेनूअंतर्गत प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार प्रादेशिक आणि हंगामी खाद्यपदार्थ मिळणार आहेत. या जेवणाचे शुल्क प्रवाशांच्या तिकीटामध्ये समाविष्ट केले जाणार नाही. मात्र, जेवण आधीच तिकिटात समाविष्ट केले असल्यास, मेनू आयआरसीटीसी ठरवेल, प्रवासी नाही. प्रीपेड ट्रेन, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा फूड मेनू निश्चित बजेटनुसार दिला जाईल.

- Advertisement -

IRCTC च्या मेनूमध्ये काय असणार?

रेल्वेच्या या नवीन मेनूमध्ये प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि आवडीचे पदार्थ, हंगामी पदार्थ, सण-उत्सवांदरम्यानच्या गरजा, तसेच मधुमेही अन्न, बेबी फूड आणि हेल्थ फूड पर्याय यांसारख्या गटांसाठीचे अन्न यांचा समावेश असेल. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, प्रीपेड गाड्यांमधील मेनू आयआरसीटीसीने आधीच अधिसूचित केलेल्या टॅरिफमध्ये निश्चित केला जाईल. तसेच, प्रीपेड ट्रेनमधील मेनू IRCTC ने आधीच ठरवलेल्या बजेटमध्ये प्रदान केला जाईल. याशिवाय या गाड्यांमध्ये ए-ला-कार्टे खाद्यपदार्थ आणि ब्रँडेड खाद्यपदार्थांना एमआरपीवर परवानगी दिली जाईल. ए-ला-कार्टे फूडचा मेनू आणि दर IRCTC द्वारे ठरवले जातील.

- Advertisement -

या गाड्यांमध्येही विक्रीला परवानगी असेल

  • बजेट सेगमेंट ट्रेन्सचा मेनू IRCTC द्वारे पूर्व-निर्धारित दरामध्ये दिला जाईल.
  • मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये एमआरपीवर ए-ला-कार्टे जेवण आणि ब्रँडेड खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी असेल.
  • मेनू आणि दर IRCTC द्वारे ठरवले जातील.
  • जनता जेवणाचे दर आणि मेनूमध्ये कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -