घरमुंबईराज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर!

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर!

Subscribe

स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना पाठवले

महाराष्ट्रात करोना संसर्गामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून त्याचा आढावा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक बुधवारी रात्री सात वाजता राजभवनावर होणार होती. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत.

राजभवन येथे सायंकाळी सात वाजता ही बैठक सुरू झाली. मात्र, या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. राज्यातील करोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, भविष्यात कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, राज्यात लॉकडाऊनमुळे नेमकी आर्थिक स्थिती कशी आहे, या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी या बैठकीला अनुपस्थित असले तरी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, विविध विभागांचे सचिव, पोलीस महासंचालक व अन्य प्रमुख अधिकारी बैठकीला हजर होते. त्यांनी राज्यपालांना सविस्तर माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सकाळीच फोनवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -