घरमुंबईआयुक्तांच्या मनमर्जी कारभाराला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा - सुहास सामंत

आयुक्तांच्या मनमर्जी कारभाराला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा – सुहास सामंत

Subscribe

बेस्ट संघटनेने आज पालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक यांच्याविरोधात आज आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढला.

मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि बेस्टचे महाव्यस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना प्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. आज मुंबईच्या आझाद मैदानावर महापालिका आणि बेस्ट महाव्यवस्थापक हटाव या मागणीसाठी शिवसेना प्रणित बेस्ट कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कस युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी सुहास सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच जोरदार टीका केली.

नेमकं काय म्हणालेत सामंत  

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचन नाम्यामध्ये मुंबईकरांना बेस्टचा आणि पालिकेचा अर्थसंकल्प एकत्र करू असे सांगितले होते. जेणे करून मुंबईची धमणी म्हणजे बेस्ट वाहिनी तरेल. त्यामुळे मी हा ठराव बेस्ट समितीमध्ये मांडला. तो स्थायी समीतीमध्ये देखील पास झाला. त्याला आता ८ महिने झाले. तरी देखील या आयुक्तांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवलेला नाही. हा पाठवेला नाही की हा ठराव पाठवू नका असे कोणी सांगितले का हे आम्हाला कळायला हवे. जोपर्यंत हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आम्ही या आयुक्तांना आणि महाव्यवस्थापकांना खुर्चीवर बसू देणार नाही. तसेच आयुक्तांच्या जाणीव पूर्वक सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा असल्याची टीका सामंत यांनी केली.

- Advertisement -

काय आहे संघटनांचा आरोप

– बेस्ट महाव्यस्थापक विचित्र वागत असून, त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही

– बेस्टच्या कामगारांना पदाप्रमाणे काम दिले जात नाबी त्यामुळे कामगारांची कार्यक्षमता ढासळली आहे.

- Advertisement -

– गेल्या दोन वर्षांकरीताचे सर्व कामगार-कर्मचारी-अधिकाऱ्यांचे रजेचे रोखीत रुपांतर, रजा प्रवास भत्ता महाव्यवस्थाकांनी रोखून धरला आहे.

– बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा  ग्रॅज्यूअटी रोखून धरण्यात आली आहे.

– बेस्ट महाव्यवस्थापकांचा हम करो सो कायदा

– ट्रायमॅक्स मशिनमुळे बेस्टचे करोडोंचे नुकासान झाले

बेस्ट कामगार संपाला मात्र सौम्य प्रतिसाद

दरम्यान बेस्ट कामगार संघटना, मुंबई इलेक्ट्रिक वर्कस युनियन आणि बेस्ट कामगार क्रांती सेनेकडून काढण्यात आलेल्या आजच्या मोर्चामध्ये मात्र सौम्य प्रतिसाद पहायला मिळाले. बेस्ट सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून काम संपवूनच अनेक कर्मचाऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतल्याचे पहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -