घरमुंबई१४ हजार ८२० जणांना लागले सिडकोचे घर

१४ हजार ८२० जणांना लागले सिडकोचे घर

Subscribe

नवी मुंबई :स्वत: चे हक्काचे घर असावे या आशेने सिडकोच्या महागृह निर्माण प्रकल्पात नशीब आजमावणार्‍या लाखो नागरिकांच्या हक्काच्या घरांचा निर्णय मंगळवारी जाहीर झाला. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली तर अनेकांचा आनंद मावेनासा झाला. लाखो नागरिकांमधून 14 हजार 838 नागरिकांना मंगळवारी झालेल्या सोडतीत घरे मिळाली आहेत. प्रलंबित असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सिडकोने विविध आर्थिक गटांसाठी नवी मुंबई क्षेत्रात पुढील वर्षभरात 55 हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी14 हजार 820 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

सिडकोने काढलेल्या या लॉटरीवर लोकांच्या उड्या पडल्या आहेत. एकूण एक लाख 91 हजार 898लोकांनी अर्ज दाखल केले होते. सिडको भवनमध्ये या लॉटरीची सोडत काढण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली होती. सोडत काढल्यानंतर ज्यांना घर लागले आहे ती यादी सिडकोच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अनेकांनी सिडको भवनमध्ये उपस्थिती लावली. मुंबईत अनेक वर्षांनंतर हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे समाधान होते. आपले नाव दिसताच अनेकांनी जल्लोष व्यक्त केला.

- Advertisement -

सिडकोची घरे स्वस्त असल्याने हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान लाभार्थ्यांच्या चेहर्‍यावर होते.सिडकोतर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील 14 हजार 838परवडणार्‍या घरांची ऑनलाईन संगणकीय सोडत मंगळवार,दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सिडको भवन येथे संपन्न झाली.

सोडतीसाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर ‘मे. प्रॉबिटी सॉफ्ट’ यांच्यामार्फत सिडकोच्या आवश्यकतेनुसार विकसित करण्यात आले होते. संगणकीय सोडत काढताना अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच बीज क्रमांक म्हणून गृहित धरण्यात आला होता. प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या अर्जातून स्वतंत्रपणे योजना संकेत क्रमांक व आरक्षण प्रवर्ग क्रमांक निहाय जाहीर सोडत संगणकाद्वारे काढण्यात आली. परंतु जर प्रत्येक योजनेत अथवा प्रवर्गाकरिता उपलब्ध सदनिकांच्या संख्येपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले अथवा पहिल्या सोडतीनंतर सदनिका शिल्लक राहिल्यास ज्या अर्जदारांनी अर्ज भरतेवेळी ‘अन्य गृहनिर्माण योजनेतील रिक्त सदनिका देण्याबाबत आपला विचार व्हावा’यासाठी संमती दिली असेल अशा अर्जदारांमधूनच सोडत काढण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -