घरमहाराष्ट्रराजपथावर 'भारत छोडो' चित्ररथाचे शानदार प्रदर्शन आणि बरच काही....

राजपथावर ‘भारत छोडो’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन आणि बरच काही….

Subscribe

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर झालेल्या पथसंचलनामध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाचा इतिहास जिवंत करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षक ठरला. आज राजपथावर ७० वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.

‘वंदे मातरम’ च्या सुरात १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचा इतिहास जिवंत करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी एनसीसी आणि एनएसएस पथकाचे नेतृत्व केले. तर, डॉ. तनुजा नाफडे यांनी भारतीय लष्करासाठी संगीतबद्ध केलेली शंखनाद मार्शलधूनही प्रथमच राजपथावर वाजली. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सेरियल रामफोसा यांच्या सह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर ७० वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.

लांस नायक नसीर वाणी यांना शौर्य पदक ‘अशोक चक्र’ जाहीर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरणार्थ सदैव तेवत राहणाऱ्या इंडिया गेट स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ देशवासियांच्या वतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत आणि त्यासोबतच २१ तोफांची सलामी देण्यात आली. लांस नायक नसीर वाणी यांना अभूतपूर्व शौर्य आणि बलिदानासाठी मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’ जाहीर झाले. आज या समारंभात नसीर वाणी यांच्या पत्नी आणि आईने हे शौर्य पदक राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारले. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, रणगाडे, ब्रम्होस मिसाईल, स्वाती रडार, युद्ध टँक, आकाश मिसाईल, लष्कर, नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथके उपस्थितांचे आकर्षण ठरले.

- Advertisement -

हेही वाचा – डोंबिवलीत १५० फूट उंचीचा राष्ट्रध्वज; देशात तिसऱ्या स्थानी!

महाराष्ट्राच्या ‘भारत छोडो’ चित्ररथाने जिंकली मने

देशप्रेमाने ओतप्रोत ‘वंदे मातरम…..’ या राष्ट्रगाणाची धून आणि ‘करेंगे या मरेंगे’, ‘भारत छोडो’ अशा घोषणांच्या निनादात ‘भारत छोडो’ आंदोलनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी स्वातंत्र्याची चळवळच अनुभवली. चित्ररथाच्या पुढील भागात दृढनिश्चय आणि करूणामयी स्वभाव दर्शविणारा आणि भारत छोडोची घोषणा देणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची मोठी प्रतिमा सर्वांचे आकर्षण ठरली. चित्ररथाच्या मध्यभागी एकतेचे प्रतीक असणारा ‘चरखा’ आणि चित्ररथाच्या शेवटच्या भागात मुंबईची खास ओळख ‘गेट वे ऑफ इंडिया’ ची प्रतिकृतीही लक्षवेधी ठरले. ‘छोडो भारत चळवळी’ ची भव्यता दर्शविणारा जनसागर चित्ररथाच्या दोन्ही बाजूस विविध म्युरल्सच्या माध्यमातून दर्शविण्यात आला. तोही उपस्थितांच्या पसंतीस उतरला. चित्ररथावर कलाकारांनी घोषणा देणारे स्वातंत्र्यसैनिक आणि इंग्रज पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका साकारल्या . याशिवाय चित्ररथाच्या दोन्ही बाजूला ‘करेंगे या मरेंग’, ‘भारत छोडो’ अशा घोषणा देणाऱ्या एकूण ३५ कलाकारांनी भारत छोडो चळवळीचा ऐतिहासिक लढा साकारला होता.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरे-भाजपमध्ये आता ‘व्यंगचित्र’ वॉर!

सागर मुगलेने एनसीसीचे, तर दर्पेश डिंगरने केले एनएसएसचे नेतृत्व

औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाचा कॅडेट सागर मुगले याने राजपथावरील १४४ सदस्यीय एनसीसी पथकाचे नेतृत्व केले. राज्यातील २२ कॅडेट्स पथसंचलनात सहभागी झाले. पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरींगचा विद्यार्थी दर्पेश डिंगर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व केले. राज्यातील एनएसएसच्या १४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या पथसंचलनात सहभाग घेतला.

महाराष्ट्राच्या एंजल देवकुळे आणि तृप्तराज पंड्या यांना उपस्थितांचे अभिवादन

पथ संचलनात प्रधानमंत्री बाल पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एंजल देवकुळे आणि तृप्तराज पंड्याही पथ संचलनात सहभागी झाले. उपस्थितांनी उभे राहून आणि टाळयांच्या गजरात या दोघांना अभिवादन केले. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी एंजल देवकुळे हिला तर कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी तृप्तराज पंड्या यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. एकूण २६ पुरस्कार विजेते बालक यावेळी सहभागी झाले.

महाराष्ट्र कन्येने तयार केलेली मार्शल धून प्रथमच राजपथावर वाजली

नागपूरच्या धरमपेठ महाविद्यालयात संगीताच्या प्राध्यापिका डॉ. नाफडे यांनी भारतीय लष्करासाठी संगीतबद्ध केलेली शंखनाद, ही पहिली ‘मार्शल धून’ आज राजपथावर वाजली. हा ऐतिहासिक क्षणच ठरला असून या प्रजासत्ताक दिनापासून प्रथमच ‘ब्रिटीश मार्शल धून’ ऐवजी भारतीय ‘मार्शल धून’ वाजण्याची पंरपरा सुरु झाली आहे. भारतीय वायुसेनेच्या फ्लाईंग पासमध्ये हेलीकॉप्टरवर भारतीय तिरंग्यासोबत तीन सेनादलांचे झेंडे फडकताना दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -