घरमुंबईगटविकास अधिकाऱ्यांचाही भरणार जनता दरबार, ग्रामविकासमंत्री स्वत: राहणार उपस्थित

गटविकास अधिकाऱ्यांचाही भरणार जनता दरबार, ग्रामविकासमंत्री स्वत: राहणार उपस्थित

Subscribe

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार भरवण्याच्या विशेष सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

तालुक्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता गटविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश शासन परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार भरवण्याच्या विशेष सूचनाअधिकाऱ्यांना केल्या आहेत. हा जनता दरबार प्रत्येक शुक्रवारी जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणी सोडवण्याचे काम करणार आहे. लोकांना या बैठकीस उपस्थित राहून थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडता येणार आहेत. या सभेबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीमध्ये आलेल्या लेखी तक्रारीतील सर्व तक्रारदारांना सभेपूर्वी ८ दिवस आधी माहिती देण्यात येणार आहे. या सभेअंतर्गत होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना देखील परिपत्रकात करण्यात आल्या आहेत.

ग्रामविकासमंत्री स्वत:आढावा घेणार

जनता दरबारात जनतेने दाखल केलेल्या तक्रारींना न्याय मिळावा, हा जनता दरबाराचा उद्देश आहे. जनतेच्या प्रश्नांबाबत शासन संवेदनशील असून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने होण्याच्या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘या उपक्रमाचा मी स्वत:आढावा घेणार असून लोकांनी याचा लाभ घेऊन गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधावा’, असे आव्हान मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -