घरमुंबईऑटोरिक्षा, टॅक्सीचालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सॲपवर तक्रार; आरटीओकडून आवाहन

ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकाने भाडे नाकारल्यास करा व्हॉट्सॲपवर तक्रार; आरटीओकडून आवाहन

Subscribe

मुंबई : शहर व उपनगरातील ऑटोरिक्षा अथवा टॅक्सी चालकाने भाडे नाकारले, जादा भाडे आकारले, गैरवर्तन केल्यास 9152240303 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करण्याचे आवाहन मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय अहिरे यांनी केले आहे. (Complain on WhatsApp if autorickshaw taxi driver refuses fare Appeal from RTO)

हेही वाचा – मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, ‘या’ सखल भागांत साचले पाणी

- Advertisement -

मुंबई व मुंबई उपनगरातील बहुतांशी प्रवाशांची वाहतूक ही काळी पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षा मधून होत असते. वाहतुकीदरम्यान प्रवाशांशी गैरवर्तन, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी प्राप्त होत असतात. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि तक्रार करण्यास अडचणी येऊ नयेत यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वरील व्हॉट्सॲप क्रामकावर मेसेज, फोटो किंवा ई-मेलद्वारे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कॉल स्वीकारले जाणार नाहीत, असे सांगतानाच अधिकाऱ्यांनी म्हटले की, तक्रारीमध्ये वाहन क्रमांक, ठिकाण, वेळ, थोडक्यात तक्रारीचे स्वरूप, तक्रारदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी नमूद करण्यात यावा. संबंधित दोषी चालकांवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – बीएमसीत पालकमंत्र्यांना केबिन कशाला? आदित्य ठाकरेंचा सवाल

- Advertisement -

बऱ्याचदा जास्त भाड्याच्या लांब पल्याच्या भाड्याची अपेक्षा असल्याने टॅक्सी किंवा रिक्षा चालक जवळचे भाडे हमखास नाकारतात. रिक्षा थांब्यावर जाऊनसुद्धा असे रिक्षा चालक भाडे नाकारतात तसेच उद्धटपणे बोलतात. अशा अनेक घटना रोज मुंबई तसेच उपनगरातील नागरिकांना अनुभवाला मिळतात. याच गोष्टीवरून अनेकदा प्रवासी आणि टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक यांच्यात वाद होतो आणि विकोपाला जातो. रस्त्यात मारामाऱ्या झाल्याचा घटना घडल्या आहेत. खास करून पावसाळ्यात महिला आणि आबालवृद्धांना या समस्येला सामोरे जावे लागते. भर पावसात भिजत असणारे प्रवासी जेव्हा भाड्याबद्दल विचारतात, परंतु रिक्षा चालक बिनदिक्कतपणे ते नाकारतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करून नव्या रिक्षा, टॅक्सीची वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो किंवा आपल्या नियोजीत ठिकाणी चालत जावे लागते. परंतु आता मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून होणाऱ्या कारवाईमुळे रिक्षा तसेच टॅक्सी सुधारतील का हे पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -