घरमुंबईगुरूकुल शाळेत विद्यार्थ्याला मारहाण, वॉर्डन विरोधात गुन्हा दाखल

गुरूकुल शाळेत विद्यार्थ्याला मारहाण, वॉर्डन विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

खालापूरमध्ये गुरुकुल शाळेमध्ये वॉर्डनने शाळेतल्या एका विद्यार्थ्याला हँगरने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खालापूर येथील श्री स्वामी नारायणन इंटरनॅशनल स्कूल (गुरूकुल) येथे एका वॉर्डनने १० वर्षांच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. आदित्य तिवारी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी आनंद नामक वॉर्डनवर खालापूर पोलीस ठाण्यात बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.

नक्की घडलं काय?

आदित्य कल्याण येथे रहात असून खालापूर येथील गुरूकुलमध्ये शिक्षणासाठी तेथील हॉस्टेलमध्ये रहावयास आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ मस्ती केल्याच्या कारणावरून वॉर्डन आनंद याने मुलाला हँगरने बेदम मारहाण केली. पाच दिवसांनंतर मुलगा रक्षाबंधनासाठी घरी आल्यावर त्याच्या पाठिवर वळ असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या कुटुंबियांनी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. मात्र, सदर प्रकरण कोळसेवाडी हद्दीतील नसल्याने खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – शिक्षकाकडून शाळेतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण

वॉर्डनवर कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शिवनलिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिरूद्ध कुलकर्णी आणि जिल्हाध्यक्ष गणेश मिश्रा आणि अॅड. विशाल गायकवाड यांनी खालापूर पोलीस ठाण्यास भेट देत संबधित वॉर्डनवर कठोर कारवाईची मागणी केली. सध्या वॉर्डन फरार झाला असून अजूनही त्याला अटक केलेली नाही. यापूर्वी या शाळेत अशा घटना घडल्या असून गुरूकुल प्रशासनाला जबाबदार धरून त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी फरार वॉर्डनचा तपास सुरू केला आहे. मुलाच्या नातेवाईकांनी देखील वॉर्डनविरोधात कठोर कारवाईचीच मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -