घरमुंबईकाँग्रेस नगरसेविका स्टेफी केणींचे सदस्यत्व रद्द

काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणींचे सदस्यत्व रद्द

Subscribe

जातप्रमाणपत्र ठरले अवैध, सेनेचा एक नगरसेवक वाढणार

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. मालाड येथील प्रभाग क्रमांक 32च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने, त्यांची जागी दुसर्‍या क्रमांकावरील शिवसेनेच्या उमेदवार गीता भंडारी यांची निवड होण्याचा मार्ग खुला झाला आहे. केणी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होणार असल्याने आगामी महापालिका सभागृहात गीता भंडारी यांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

महापालिकेत चार अपक्षांसह शिवसेनेचे 88 नगरसेवक आहेत. त्यात मनसेच्या सहा नगरसेवकांची भर पडल्याने संख्या 94 झाली आहे. परंतु आता मालाड येथील काँग्रेस नगरसेविका स्टेफी केणी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. हायकोर्टाने याबाबतीत काही दिवसांपूर्वी निर्णय दिला आहे. या निर्णयाची प्रत महापालिका आयुक्त तसेच कोकण विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात आली आहे. त्यामुळे केणी यांचे नगरसेवकपद जावून त्यांच्या रिक्त जागी दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवार शिवसेनेच्या गीता भंडारी यांची वर्णी लागली जाणार आहे.

- Advertisement -

यापूर्वी अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने दुसर्‍या क्रमांकाचे सेनेचे राजू पेडणेकर यांची महापालिका सदस्यपदी निवड झाली आहे. तर सांताक्रुझ येथील सेनेचे सगुण नाईक यांचे जातप्रमाणपत्रही अवैध ठरल्याने दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसच्या रफिक शेख यांची वणी लागणार आहे. सगूण नाईक यांचे सदस्यत्व रद्द होवून दोन महिने उलटत आले तरी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा केली जात नाही. मात्र, दुसरीकडे काँग्रेस नगरसेविका केणी यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होताच शिवसेनेने आपल्या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी फिल्डींग लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -