घरCORONA UPDATECorona: हॉस्पिटलमधून अशोक चव्हाण यांचा व्हिडिओ संदेश; सोनियांच्या आंदोलनाला पाठिंबा

Corona: हॉस्पिटलमधून अशोक चव्हाण यांचा व्हिडिओ संदेश; सोनियांच्या आंदोलनाला पाठिंबा

Subscribe

कोरोनामुळे हतबल झालेल्या देशातील कोट्यवधी नागरिकांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अभियान राबवले जात आहे. या अभियानात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सहभाग दर्शवला असून केंद्र सरकारनेही या मागण्या मंजूर कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे. अशोक चव्हाण सध्या कोरोनाबाधित असून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तिथून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही राजकीय घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत. हॉस्पिटलमधून त्यांनी जारी केलेला हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या ‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेबद्दलचा असून केंद्र सरकारकडे सर्वसामान्यांच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती त्यांनी या माध्यमातून केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अशोक चव्हाण

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम हाती घेतली आहे. कोट्यवधी देशवासियांचे जे मनोगत आहे. त्यांचा आवाज बुलंद करण्याच्या दृष्टीने मीदेखील मुंबईतील रुग्णालयातून कोरोनाशी लढा देत असताना ‘स्पीक अप इंडिया’ या मोहिमेत सहभागी होत आहे. केंद्र सरकारला जाणीव आणि विनंती करायची आहे की, करोनाचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य, शेतमजूर, शेतकरी आणि गरिबांना बसला आहे. लघू-मध्यम उद्योगांनाही फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये मी सहभाग नोंदवत आहे.

हेही वाचा –

मुंबईत बनावट प्रवास पासचं रॅकेट उघड; सर्वाधिक पास कोकणातील चाकरमान्यांकडे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -