घरमुंबईGoodNews! बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिकांना मिळणार रोजगार: NHSRCL

GoodNews! बुलेट ट्रेनच्या कामातून ९० हजारहून अधिकांना मिळणार रोजगार: NHSRCL

Subscribe

तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची आवश्यकता

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना अनेक कंपन्यांची आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली तर काहीं कंपन्यांचे ऑफिस बंद झाल्याने कर्मचाऱ्याचा रोजगार देखील गेला. मात्र बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत बांधकामादरम्यान ९० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने ही घोषणा (NHSRCL) केली आहे. या बांधकामाच्या वेळीच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे ९० हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

तंत्रज्ञ आणि कुशल कामगारांची आवश्यकता

महामंडळाच्या प्रवक्त्या सुषमा गौर दिलेल्या माहितीनुसार, ५१ हजारांपेक्षा जास्त तंत्रज्ञ, कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता आहे, यामध्ये तंत्रज्ञ आणि कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असून अशा लोकांना विविध संबंधित कामांसाठी प्रशिक्षण देणार आहे. ट्रॅक लावण्यासाठी, कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही कॉर्पोरेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार

दरम्यान, जपान सहाय्य प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत अहमदाबाद येथे करण्यात आले होते. याचेच बांधकाम सुरू झाल्यावर अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होणार असून ४६० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या ट्रॅकमध्ये एकूण २६ किलोमीटर बोगदे, २७ लोखंडी पूल, १२ स्टेशन्स आणि ७ किलोमीटर अंडरग्राऊंड बोगदे, इतर सुपर स्ट्रक्चर्स आहेत. बांधकाम चालू असताना ७५ लाख टन सिमेंट आणि २१ लाख टन स्टील वापरण्याचा अंदाज असण्याची माहिती देखील देण्यात आली.


अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना दिलासा; पश्चिम रेल्वेच्या १५० फेऱ्या वाढणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -