घरमुंबईअंबरनाथमध्ये दुषीत पाणी पुरवठा; नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिलं दुषीत पाणी भेट!

अंबरनाथमध्ये दुषीत पाणी पुरवठा; नागरिकांनी अधिकाऱ्यांना दिलं दुषीत पाणी भेट!

Subscribe

अंबरनाथ शहरात काही भागात दूषित पाणीपुरवठा व कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा याबाबत तक्रारीकरून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजप सरचिटणीस राजेश कोठाळे भाजप कार्यकर्ते व स्थानिक महिलांनी केला आहे. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्या अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिल्या, 2 दिवसात या समस्यांचे निराकरण न झाल्यास कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा त्यांनी दिला आहे .

अंबरनाथ (प) येथील घाडगेनगर व नवीन भेंडीपाडा या विभागात नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच बौद्धविहार समोरील कलव्हर्ट खालून गेलेली जलवाहिनी सांडपाण्याच्या गटरमधून गेल्याने अनेकवेळा दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून याठिकाणी टायफाईड व इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

- Advertisement -

वरील सर्व कारणांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला असून त्याबाबत १० डिसेंबरला संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांना यासंदर्भात पूर्ण माहिती देण्यात आली होती तसेच पत्रव्यवहार ही करण्यात आला होता. परंतु 13 दिवस होऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने या परिसरातील नागरिकांनी भाजप सरचिटणीस राजेश कौठाळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्ते व स्थानिक महिलांनी अधिकारी बसनगर यांची भेट घेऊन त्यांना दूषित पाण्याने भरलेल्या बाटल्या भेट म्हणून दिल्या. तसेच दोन दिवसात ही समस्या सोडविली नाही तर नागरिकांचा मोर्चा आयोजित करण्यात येईल असे सांगितले. बसनगर यांनी याबाबत कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -