घरCORONA UPDATECorona : मुंबईमध्ये कोरोनाचे १०० बळी, बाधितांची संख्या १५४९ वर

Corona : मुंबईमध्ये कोरोनाचे १०० बळी, बाधितांची संख्या १५४९ वर

Subscribe

मुंबईमध्ये सोमवारी कोरोनाने १०० बळींचा आकडा पूर्ण केला. मुंबईमध्ये सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १५० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील बाधितांचा आकडा १५४९ वर पोहचला आहे.

mumbai corona count

- Advertisement -

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ सोमवारीही कायम होती. मात्र सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील बळींची संख्या १०० वर पोहोचली आहे. मृत झालेल्या व्यक्तींपैकी ७ जण हे दीर्घकाळ आजारी होते. तर दोनजण हे वयोवृद्ध होते. मुंबईमध्ये सोमवारी तब्बल १५० कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्याचप्रमाणे २५९ संशयित रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल ४७३३ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी मुंबईमध्ये ४३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत ३२ हजार ६४५ इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -