घरट्रेंडिंगVideo: कोरोना विरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी गुगलने साकारले विशेष डूडल

Video: कोरोना विरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांसाठी गुगलने साकारले विशेष डूडल

Subscribe

गुगलने आपले अनोखे डूडल साकारत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले आहे.

गुगल नेहमीच डूडलच्या माध्यमातून अनेक महान व्यक्तींचे कार्य किंवा काही ऐतिहासिक घटनांची आठवण करून देत असतो. मात्र यावेळी गुगलने आपले अनोखे डूडल साकारत वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे. तसेच कोरोनाविरोधातील युद्धात आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या डॉक्टरांसह मेडिकल स्टाफचे आभार मानले आहे. यापुर्वी देखील गुगलने असेच सामाजिक संदेश देणारे डूडल साकारले होते. त्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच सुरक्षित रहावे, असे आवाहन करण्यात आले होते.

- Advertisement -

 

संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध लढत आहे, परंतु जास्तीत जास्त योगदान डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आहे, जे २४ तास रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी गुगलने हे विशेष डूडल साकरले आहे. कोरोना व्हायरस सारख्या कठीण प्रसंगी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आणि लॉकडाऊन दरम्यान गरजूंना आवश्यक वस्तू पुरविणाऱ्या लोकांचे गुगलने डूडलच्या माध्यमातून आभार मानले आहे.

- Advertisement -

CoronaVirus: नवजात बालकाचे नाव ठेवले सॅनिटायझर!

देशात मृतांचा आकडा ३०० पार

कोरोना व्हायरसने भारतात आता ३०८ लोकांचा बळी घेतला आहे. मागच्या २४ तासात ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण रुग्णांच्या आकड्यातही वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी संध्याकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ हजार ४४७ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७४६ लोक बरे झाले आहेत. तर २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -