घरताज्या घडामोडीकरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातून ४०० कैदी हलवले

करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातून ४०० कैदी हलवले

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातून ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना व्हायरसने आता महाराष्ट्रात हात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हा करोना व्हायरस आता मुंबईत येऊन दाखल झाला आहे. आतापर्यंत मुंबईत सहा रुग्ण आढळून आले असून राज्यातील करोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातून ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कैद्यांना न्यायालयात नेले जाणार नाही

आर्थर रोड कारागृहाची क्षमता ८०५ कैदी सामावण्याची आहे. मात्र, सध्या त्या ठिकाणी ३ हजार ४०० कैदी होते. त्यामुळे त्यातील ४०० कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे विविध गुन्हे प्रकरणातील कैद्यांना सुनावणीसाठी पुढील काही दिवस न्यायालयात नेले जाणार नाही, असा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, आर्थर रोड कारागृहात आयसोलेशन वॉर्डसाठी राखीव ठेवण्यात आले असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या कैद्यांना निसर्गोपचारही देण्यात येणार आहे. तसेच आर्थर रोडप्रमाणे ठाणे, कल्याण मधील जादा कैदी तळोजा कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे.


हेही वाचा  – करोनाच्या धास्तीने सरकारी कार्यालये देखील काही दिवस बंद राहणार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -