घरमुंबईमुंबईत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी होणार?

मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी कोरोना चाचणी होणार?

Subscribe

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने मुंबई महानगर पालिकेने नवी रणनीती आखली आहे. तसंच मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यावर वचक ठेवण्यासाठी कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी तसे संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईत प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती दिली.

मुंबईत सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत प्रवेश करणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा विचार सुरु आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. पालिका कोरोनावर मात करण्यासाठी तयार आहे. वरळीमध्ये नवीन बेड तयार करण्यात आले आहेत. येत्या काळात २५ ते ३० हजार बेड मुंबईत तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती महापौर यांनी दिली. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांनी करून दाखवलं आहे. आई आजारी असून देखील आदित्य ठाकरे कोरोनाकाळात काम करत आहेत. ज्या सोयी मुंबईत करतोय त्या नक्कीच मुंबईकरांना फायद्याच्या ठरतील, असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. नागरिकांनी देखील जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.

- Advertisement -

मुंबईत पालिका रुग्णालयात रेमडीसीविर मिळत आहे. खासगीमध्ये रेमडीसीविर नाही आहे. मुंबईत गर्दी होतेय यावर आयुक्त आणि वार्ड ऑफिसर पूर्णपणे लक्ष देऊन आहेत. गर्दी होत असेल तिथे कारवाई केली जाईल. नागरिकांना देखील आव्हान आहे की गर्दीच्या ठिकाणी न जाता सर्व नियम पाळावेत, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -