घरमुंबईCorona Update : सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन पुन्हा सुरू; 'इतक्या' डोसचे टार्गेट

Corona Update : सीरम इन्स्टिट्यूटकडून कोव्हिशिल्डचे उत्पादन पुन्हा सुरू; ‘इतक्या’ डोसचे टार्गेट

Subscribe

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील वर्षी करोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्यामुळे कोव्हिशिल्ड लशींचे (Covishield vaccines) उत्पादनही थांबवण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. यापार्श्वभूमीवर आता लसींचे उत्पादन पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना कोव्हिशिल्ड लसींचा तुडवडा होऊ लागला आहे. यापार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेसुद्धा कोव्हिशिल्ड लसींचे उत्पादन पुन्हा सुरु केले आहे. त्यामुळे पुढील ९० दिवसांत ६ ते ७ मिलियन अर्थात ७० लाख कोविशिल्ड लशीचे डोस तयार करण्याचे टार्गेट आहे. अशी माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला (Another Punawala) यांनी दिली आहे. त्यांनी बुधवारी (12 एप्रिल) सांगितले की, विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 लस कोविशील्डचे उत्पादन पुन्हा सुरू केले आहे. ते म्हणाले की कोवॅक्स लसीचे 60 लाख बूस्टर डोस कंपनीकडे आधीच उपलब्ध आहेत आणि प्रौढांनी हे बूस्टर डोस जरूर घ्यावे. COVID-19 लसींचा तुटवडा असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, लस उत्पादक तयार आहेत पण मागणी नाही.

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून मागील चोवीस तासांत 1,115 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 5421 झाली आहे. काल दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून 560 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के असून मृत्यूचा दर 1.82 टक्के आहे. तसेच राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळांवर परदेशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची थर्मल स्कॅनिंग सुरू करण्यात आली असून २ टक्के प्रवाशांची रँडमली कोविड चाचणीही केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -